दिगंबर भुजबळ यांना ध्येय राज्यस्तरीय गौरव पुरस्कार2024 जाहीर
By : Polticalface Team ,04-10-2024
दिगंबर भुजबळ यांना ध्येय राज्यस्तरीय गौरव पुरस्कार2024 जाहीर
अहमदनगर प्रतिनिधी
महाकवी कालिदास नाट्यमंदिर शालीमार नाशिक येथे दिनांक 2 ऑक्टोबर 2024 रोजी झालेल्या कार्यक्रमात या पुरस्काराचे वितरण झाले. यासाठी कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून श्री. उत्तम कांबळे - ज्येष्ठ पत्रकार व लेखक , तसेच प्रमुख पाहुणे माननीय दिनकर टेमकर माजी शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य पुणे , प्रमुख वक्ते श्री दिनेश आदलिंग व प्रमुख आकर्षण अभिनेते रिशी जोरवर हे होते तसेच प्रमुख उपस्थिती माननीय श्री अरुण धामणे माजी शिक्षणाधिकारी होते. दैनिक युवा ध्येय या वृत्तपत्राच्या तेराव्या वर्धापन दिनानिमित्त व नाशिक विभागीय कार्यालय शुभारंभ निमित्त विशेषांकाचे प्रकाशन व पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता या सोहळ्यामध्ये श्री दिगंबर भुजबळ यांनी केलेल्या उल्लेखनीय शैक्षणिक कार्याचा गौरव म्हणून त्यांना राज्यस्तरीय ध्येय गौरव पुरस्कार 2024 उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. याप्रसंगी श्री भागवत महाले सर व त्यांचे बंधू ,शंकर शेलार सर व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते .
वाचक क्रमांक :