By : Polticalface Team ,08-10-2024
लिंपणगाव प्रतिनिधी : सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याच्या कायम व हंगामी सर्व कामगारांना सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाच्या वेतनावर 9% बोनस व कामगार सोसायटीचा 8% डिव्हीडंड येत्या पंधरा दिवसात देण्यात येणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन राजेंद्र दादा नागवडे यांनी दिली.
सोमवार दिनांक सात रोजी कारखान्याचे संचालक मंडळ सदस्य व कामगार युनियन प्रतिनिधी यांच्यामध्ये झालेल्या सामोपचार सभेमध्ये हा निर्णय घेण्यात आला. नागवडे कारखाना व्यवस्थापन व कामगार युनियन यांच्यामध्ये गेल्या 40 वर्षापासून अत्यंत सलोख्याचे संबंध असून कारखाना व्यवस्थापनाने कामगारांना नेहमी योग्य न्याय देण्याची भूमिका घेतलेली आहे. स्वर्गीय शिवाजीराव बापू नागवडे यांचा वारसा विद्यमान चेअरमन राजेंद्र दादा नागवडे व संचालक मंडळाने चालविला असून कारखान्याचे पगार नियमितपणे केले जात आहेत. या बैठकीत कारखान्यातील कायम व हंगामी कामगारांना सन 2023 -24 या वर्षीच्या वेतनावर 9% बोनस देण्यात येणार असून सीझन मधील देय असलेला ज्यादा कामाचा मेहनताना व मागील वर्षीचे रिटेन्शन फायनल पेमेंटची रक्कम तसेच कामगार पतसंस्थेकडील ठेवीवर आठ टक्के डिव्हिडंडची रक्कम येत्या 20 तारखेच्या दरम्यान कामगारांच्या खात्यात वर्ग करण्यात येणार असल्याचे नागवडे यांनी सांगितले.
यावेळी कारखान्याचे व्हा. चेअरमन बाबासाहेब भोस सर्व संचालक मंडळ सदस्य, कामगार महासंघाचे सरचिटणीस कॉम्रेड आनंदराव वायकर, युनियनचे अध्यक्ष रामभाऊ लबडे, कामगार पतसंस्थेचे चेअरमन सतीश जांभळे व्हा.चेअरमन संजय मेहेत्रे तसेच कामगार प्रतिनिधी उपस्थित होते.
वाचक क्रमांक :