स्व. शिवाजी बापू हयात असताना नागवडे कारखान्यावर कर्ज कमी पण सद्या 350 कोटी कर्ज - केशवभाऊ मगर

By : Polticalface Team ,Mon Jan 03 2022 11:00:21 GMT+0530 (India Standard Time)

स्व. शिवाजी बापू हयात असताना नागवडे कारखान्यावर कर्ज कमी  पण सद्या 350 कोटी  कर्ज - केशवभाऊ मगर सहकार महर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकारी कारखान्यात गेली ११ वर्षापासून डीसलरी बंद असल्याने वर्षाला ९ कोटीचा तोटा होत असल्याने सभासदांच्या उसाला बाजार भाव मिळत नसल्याने सभासदांचा तोटा भरून काढण्यासाठी नागवडे यांनी कारखान्यावर ३५० कोटीचे कर्ज केले यात सभासदांचे मोठे नुकसान होत असून हे नुकसान टाळायचे असेल तर कारखाना सहकार विकास पैनलच्या ताब्यात द्या पुढील एक वर्षात डीसलेरी चालू करून शेजारी चालू असलेल्या अंबालिका कारखान्याप्रमाणे सभासदांना भाव देऊन सभासदांचे हित साधणार असे कारखान्याचे माजी उपाध्यक्ष केशवभाऊ मगर यांनी बेलवंडी येथे घेतलेल्या मेळाव्यात बोलताना सांगीतले. श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी येथे आमदार पाचपुते तसेच मगर गटाने नागवडे कारखान्याच्या निवडणुकी पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते भगवानराव पाचपुते यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला. त्यावेळी कार्यक्रमाला जिजबापु शिंदे, लक्ष्मण नलगे, सुवर्णा पाचपुते, गणपत काकडे, नंदकुमार कोकाटे, ॲड. बापूसाहेब भोस, ॲड.बाळासाहेब काकडे, माजी सभापती उत्तमराव आधोरे, बाळासाहेब गिरमकर, वैभव पाचपुते, सुनील दरेकर, मुन्ना ढवळे, उत्तम डाके, सुभाष काळाने, संदीप नागवडे यांच्या सह अनेक मान्यवर हजार होते,. यावेळी बोलताना मगर यांनी पुढे सांगितले की स्व. शिवाजी बापू हयात असताना नागवडे कारखान्यावर कर्ज कमी होते पण बापूंच्या नंतर मुलगा राजेंद्र यांच्या ताब्यात सत्ता गेल्या नंतर कारखान्यावर ३५० कोटींचे कर्ज झाले. मात्र ८ लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्या नागवडे यांनी परभणी येथे ६४ कोटीचा खाजगी कारखाना तसेच कराड येथे १ हजार टनी गुळाचा कारखान्यासारखे ६ खाजगी संस्था कश्या विकत घेतल्या याचे उत्तर नागवडे यांनी सभासदांना द्यावे असे मगर यांनी पोट तिडकिने सांगत नागवडे यांच्या कारभारावर सडकून टीका केली. तर भाजपचे तालुकाध्यक्ष संदीप नागवडे यांनी सांगितले की नागवडे कारखान्याच्या उभारणीत जुन्या लोकांनी पोटाला चिमटा घेत, घरातील दागदागिने विकून कारखान्याचे शेअर्स विकत घेतले आणि आता कारखाना उभा झाल्यानंतर अधक्ष नागवडे यांनी स्वतःचा मनमानी पणा करत कारखान्यातील १० हजार विरोधी सभासदांचे सभासदत्व रद्द करण्याचे पाप करत त्यांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा डाव केला होता तो केशावभाऊ मगर आणि टीमने न्यायालयीन लढाई करून त्यांचा डाव उधळून लावला. नागवडे कारखान्यात चाललेल्या गैर कारभाराला सभासद कंटाळले म्हणून नागवडे कारखान्यात सुशिक्षित सभासद बदल करून परिवर्तन घडविणारं असल्याचे नागवडे यांनी सांगितले. अध्यक्षीय भाषणात बोलताना ज्येष्ठ नेते भगवानराव पाचपुते म्हणाले की स्व. बापू नंतर सहकारात मुलगा राजेंद्र नागवडे यांनी बेबनाव सुरू करून सामान्य शेतकरी सभासदांची कामधेनू अडचणीत आणली. सहकार चांगला चलविण्या ऐवजी त्यांनी आपल्या खाजगी संस्था तयार केल्या असून सहकारी संस्था सभासद शेतकऱ्यांच्या मालकीच्या असून त्यावर कर्ज काढून आपल्या खाजगी संस्था विकत घेण्याचे कारण काय ? आम्ही देखील सहकारी संस्था चागल्या आदर्श पद्धतीने चालवितो मात्र आम्ही त्यातून आमच्या खाजगी मालमत्ता नाही उभ्या केल्या नसल्याचे सांगत नागवडे यांच्यावर जोरदार टीका केली. यावेळी आण्णासाहेब शेलार, सुवर्णा पाचपुते, जिजाबापू शिंदे, यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप तरटे यांनी केले तर आभार सोपान हिरवे यांनी मानले. चौकट : ज्यांना आम्ही कारखान्याच्या मागिल निवडणुकीत अण्णासाहेब शेलार यांना निवडून आणत त्यांना १५ वर्ष संचालक पदावर काम करण्याची संधी देऊन जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत निवडून आणले व जिजाबापू शिंदे यांना ही पंचायत समितीचे सदस्य केले त्यांनीच तीन चार महिन्यांपूर्वी झालेल्या पंचायत समितीच्या उपसभापती निवडीत लाखो रुपयांची तडजोड करत फुटीरवादी भूमिका घेतात हे काय सभासदांचे हित साधत सहकार सांभाळणार असा कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी नाव न घेता येेळपने येथील जाहीर सभेत बोलताना टोला लगावला .
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.