By : Polticalface Team ,16-10-2024
जनआधार न्युज भिमसेन जाधव
पुणे सध्या अशीच एक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये पुणेकर तरुण हातात पाटी घेऊन तुम्हाला रस्त्यावर उभा असलेला दिसेल. या पाटीवर त्याने चोरीला गेलेली गाडी शोधण्यास मदत करण्याची विनंती केली आहे. ही पोस्ट पाहून तुम्हीही भावुक व्हाल.
सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. कधी कोणी डान्स करताना दिसतो तर कधी कोणी गाणी म्हणताना दिसतो, कधी कोणी स्टंट करताना दिसतो तर कधी कोणी जुगाड दाखवताना दिसतो. सोशल मीडियावरील व्हायरल होणाऱ्या अनेक व्हिडीओमधून आपल्याला नवनवीन गोष्टी शिकायला मिळतात. अनेक लोक वेगवेगळ्या पद्धतीने सोशल मीडियाचा वापर करतात. कोणी टॅलेंट दाखवतात तर कधी समस्या सांगतात, कोणी आनंद व्यक्त करतात तर कोणी नवीन माहिती सांगतात
सध्या अशीच एक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये पुणेकर तरुण हातात पाटी घेऊन तुम्हाला रस्त्यावर उभा असलेला दिसेल. या पाटीवर त्याने चोरीला गेलेली गाडी शोधण्यास मदत करण्याची विनंती केली आहे. ही पोस्ट पाहून तुम्हीही भावुक व्हाल. सध्या याचे फोटो चांगलेच व्हायरल होत आहे
*“आईची शेवटची* *आठवण, प्लीज परत करा..”*
या व्हायरल फोटोंमध्ये तुम्हाला एक तरुण दिसेल. हा तरुण हातात पाटी घेऊन रस्त्यावर उभा आहे. त्याने एका पाटीवर लिहिलेय, “माझी ब्लॅक अॅक्टिवा MH14B6036 चोरीला गेली दसऱ्याच्या दिवशी, आईची शेवटची आठवण, प्लीज शोधायला मदत करा.9766617464”
तर दुसऱ्या पाटीवर लिहिलेय, “माझी गाडी चोरणाऱ्या चोराला नम्र विनंती, आईने खूप कष्ट करून १२ वी गाडी घेतली होती. आईची शेवटची आठवण आहे. प्लीज परत करा
ब्लॅक अॅक्टिवा MH14B6036
मोबाईल नंबर – 9766617464
या व्हिडीओवर एका युजरने लिहिलेय, दादा चोराला काही भावना नसतात. तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करा. ज्या ठिकाणाहून चोरीला गेली तिथे सीसीटिव्ह असेल तर चेक करून घ्या गाडी मिळेल.” या तरुणाचे नाव अभय असून काही महिन्यांपूर्वी त्याच्या आईचे कॅन्सरने निधन झाले. तो सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्टद्वारे व्यक्त होत असतो.
वाचक क्रमांक :