येत्या काही दिवसात पत्रकार भवनसाठी जागा देणार : गटनेते मनोहर पोटे: जागा उपलब्ध झाल्यावर पत्रकार भवनसाठी आमदार निधीतून २५ लाख रुपये देणार- आ. पाचपुते
By : Polticalface Team ,Mon Jan 03 2022 19:19:03 GMT+0530 (India Standard Time)
श्रीगोंदा प्रतिनिधी दि.३: नगरपरिषद किंवा राज्य शासनाने जागा उपलब्ध करून दिल्यास पत्रकार भवन बांधण्यासाठी आमदार निधीतून २५ लाख रुपये देण्याची तयारी माजी मंत्री आमदार बबनराव पाचपुते यांनी दाखवली. तर माजी नगराध्यक्ष व गटनेते मनोहर पोटे यांनी शहरातील पंतनगर मधील मोकळा भूखंड देण्यासाठी कार्यवाही सुरू करण्याची तयारी दाखवली. याचबरोबर तहसीलदार मिलिंद कुलथे यांनी आश्वासन दिले की शहरातील राज्यशासनाच्या जागा पाहुन सामाजिक विषयांतर्गत मंत्रालयात प्रस्ताव पाठवून मंजुरी मिळवून देऊ. सर्वच अधिकारी-पदाधिकाऱ्यांनी पत्रकारांच्या समस्या सोडवण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्याची जबाबदारी घेतल्याने श्रीगोंदा प्रेस क्लब वतीने येथील तहसील कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी सोमवार दिनांक ३ जानेवारी २०२२ रोजी सुरू केलेले धरणे आंदोलन मागे घेतले.
श्रीगोंदा तालुक्यातील अनेक सामाजिक,राजकीय विषय व वंचित-पीडित जनतेला न्यायहक्क मिळवून देण्यासाठी व तालुक्याचा चेहरामोहरा बदलण्यासाठी पत्रकार बांधवांचे मोठे योगदान आहे. मात्र अनेकांची राजकीय कारकीर्द घडवणाऱ्या पत्रकारांना मात्र श्रीगोंदा शहरात बसण्याची हक्काची जागा नाही. पत्रकार भवन आणि वसाहत बाबत गेल्या १५ वर्षांपासून दरवर्षी मागणी होते. मात्र ६ जानेवारी पत्रकार दिनी नेते, संस्था पत्रकारांना पत्रकार भवन बाबत घोषणा करायचे आणि गुलाबपुष्प, डायरी, पेन देऊन बोळवण करायचे. दीड महिन्या पूर्वी नव्याने स्थापन झालेल्या श्रीगोंदा प्रेस क्लबच्या वतीने ३ जानेवारी रोजी पत्रकार भवन, वसाहत, अधिस्वीकृती नियम नियम शिथिल व्हावे व पत्रकारांना निवृत्ती वेतन, मानधन, आणि पत्रकार संरक्षण कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी धरणे आंदोलन अध्यक्ष विशाल चव्हाण, सचिव मीरा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. यावेळी आंदोलकांची आमदार बबनराव पाचपुते, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भोस, गटनेते मनोहर पोटे, जिल्हा परिषद सदस्य रमेश गिरमकर, संदीप नागवडे, सतीश मखरे, प्रशांत गोरे, जितेंद्र मगर, दीपक नागवडे, भाऊसाहेब मांडे, तहसीलदार मिलिंद कुलथे, पोलीस निरीक्षक रामराव ढिकले, मुख्याधिकारी मंगेश देवरे,गटविकास अधिकारी गोरख शेलार, प्रहार संघटनेचे राजेंद्र पोकळे, रिपाईचे राजाभाऊ जगताप यांनी भेट घेतली.
यावेळी आमदार पाचपुते यांनी २५ लाख रुपये तर जितेंद्र मगर यांनी बांधकामात मदत करण्याचा पुनरुच्चार केला.
यावेळी आंदोलनात ज्येष्ठ पत्रकार प्रा.बाळासाहेब बळे, उत्तमराव राऊत, अरीफभाई शेख अध्यक्ष विशाल चव्हाण, अरीफभाई शेख, मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष अंकुश शिंदे, बाळासाहेब काकडे, मीरा शिंदे,उपाध्यक्ष विजय उंडे, कार्याध्यक्ष मुश्ताक पठाण यांनी चर्चेत भाग घेतला. तहसीलदार कुलथे यांनी जागा शोधण्यासाठी साखर कारखाने निवडणुकीनंतर लक्ष घालण्याचे मान्य केले.
आंदोलनाला प्रेस क्लबचे संघटक सुहास कुलकर्णी, प्रवक्ते राजेंद्र राऊत, सदस्य गणेश गाडेकर,अमर छत्तीसे, शरद शिंदे,भीमराव उल्हारे सह भालचंद्र सावंत, गणेश कविटकर,राजू शेख, चंदन घोडके, दादा सोनवणे, अंकुश तुपे, शफीक हवलदार , नितीन रोही, गायत्री ढवळे, अर्षद शेख, योगेश चंदन, अहमद इनामदार, शकील शेख, अमोल झेंडे, रमेश गांधी प्रमोद आहेर व मोठ्या संख्येने तालुक्यातील पत्रकारांनी सहभाग नोंदवला.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.