महादजी शिंदे विद्यालयात सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी, व्रतवैकल्ये करण्यापेक्षा सावित्रीबाईंचे विचार आणि वारसा जपा - प्रा. अरुणा तोरडमल- टकले

By : Polticalface Team ,Tue Jan 04 2022 09:29:58 GMT+0530 (India Standard Time)

 महादजी शिंदे विद्यालयात सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी,  व्रतवैकल्ये करण्यापेक्षा सावित्रीबाईंचे विचार आणि वारसा जपा - प्रा. अरुणा तोरडमल- टकले श्रीगोंदे, 3 जानेवारी श्रीगोंदा येथील रयत शिक्षण संस्थेच्या संकुलातील महादजी शिंदे विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या बद्दल विचार व्यक्त करताना प्रा. अरुणा तोरडमल यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्याचा परिचय करून दिला. आज स्त्रिया सन्मानानं शिकत आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये पुरुषांच्या बरोबरीने नव्हे तर एक पाऊल पुढे ठेवून कार्य करत आहेत. स्त्री शक्तीच्या उदयाचे कारण केवळ सावित्रीबाई फुले याच आहेत. समाजातील प्रत्येक स्त्रीची खरी माता सावित्रीबाई फुले आहेत. आठवडाभर वेगवेगळ्या देवतांची व्रतवैकल्ये करण्यापेक्षा सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वसा आणि वारसा पुढे घेऊन गेले पाहिजे असे प्रतिपादन प्रा. अरुणा तोरडमल यांनी केले. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य नवनाथ बोडके उपप्राचार्य बाळासाहेब जाधव, पर्यवेक्षक भाऊसाहेब गदादे, विलास दरेकर, सोनाली मचाले, मंजुश्री चोथे, जोत्स्ना लोखंडे, युगंधरा पाडळे चंद्रकला दरेकर स्टेजवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक महारुद्र तांबे, सूत्रसंचालन सुधाकर जानराव, तर आभार प्रदर्शन सचिन झगडे यांनी केले. याप्रसंगी विद्यार्थी विद्यार्थिनी माता-पालक , सर्व सेवक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

यवत येथील मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांच्या रांगा. ईव्हीएम मशिन मात्र संत गतीने. उशीरा पर्यंत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क.

शरद पवारांच्या सभेला आणलेल्या खुर्च्या. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत वापरल्या. तालुक्यात होतेय चर्चा

श्रीगोंदयाच्या आमदारकीवर नागवडेंचाच सर्वाधिक नैतिक अधिकार.

श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात सुरू. यवत नगरीत भक्तीमय वातावरण.

श्रीगोंद्यात वंचित च्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी, 3 साखर सम्राट विरोधात सामान्य शेतकऱ्यांचे मोठे आवाहन, सभेचा विरोधकांनी घेतला धसका

श्रीगोंद्यात धनगर समाज नागवडे सोबत- कोल्हटकर

वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ आज 1वा.ॲड प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा.गर्दीचा नवीन विक्रम होणार

विक्रम पाचपुते यांनी लोकांची फसवणूक करत गुन्हेगारीत विक्रम करत विकास कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी प्रमाणात वसुली केली तर नागवडे यांच्या 15 खोक्यांनी माझ्या तिकीटाचा सौदा केला - राहुल जगताप

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांना बहुमताने विजय करा निधी कमी पडून देणार नाही उद्धव ठाकरे

सौ अनुराधाताईंना नागवडेंना प्रचंड मताने निवडून द्या विकासाची हमी आम्ही घेतो- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत दौंड नगर परिषदेतर्फे सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन: मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे.

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या उद्याच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता

श्रीगोंद्यात मतदान अधिकारी मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न

अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात

दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील

महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.

दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.

सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन

अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद