श्रीकृष्ण हे जगाचे गुरू असल्याने त्यांचे महत्व मोठे आहे बबन महाराज मस्के यांचे प्रतिपादन महादेववाडी येथे श्रीमद् भागवत कथेची उत्साहात सांगता
By : Polticalface Team ,Wed Jan 05 2022 14:27:13 GMT+0530 (India Standard Time)
श्रीगोंदा । प्रतिनिधी
गायी संभाळत असताना भगवान श्रीकृष्णाने चरित्र केले.काल्याचे कीर्तन म्हणजे लिला असुन सर्व जगाचा गुरु श्रीकृष्ण आहे. म्हणून गुरु शिकवत असतो तो ज्ञान दान करत असतो. शंकराच्या भक्ती तून द्यानाची प्राप्ती होते. सर्व जगाला कृष्ण ज्ञान देतो म्हणून श्रीकृष्णाचे महत्व मोठे आहे प्रतिपादन बबन महाराज मस्के यांनी केले.
श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी शुगर येथील महादेववाडी येथे जेष्ठ महिला वारकरी कालिंदी विश्वंभर पांडव यांच्या प्रथम पुण्यस्मरणा निमित्त आयोजीत श्रीमद् भागवत कथा सप्ताहाच्या सांगतेच्या काल्याच्या कीर्तना प्रसंगी बबन महाराज मस्के बोलत होते. या वेळी कीर्तनात पुढे बोलतांना मस्के महाराज म्हणाले की, हा प्रसंग निर्माण होण्याचे कारण असे आहे की २० व्या शतकात आळंदी येथे संत आनंदआश्रम स्वामी होऊन गेले. त्यांची कृपा आपल्यावर झाली. शेवटच्या काळात पांडुरंग महाराज क्षीरसागर यांनी त्यांची सेवा केली. त्यांच्या भगिनी कालिंदी विश्वभंर पांडव या महिला वारकरी होत्या. त्यांची आनंदाश्रम स्वामी यांच्यावर अपार भक्ती होती. त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ कीर्तन करण्याची मला संधी मिळाली आहे. पुढे बोलतांना बबन महाराज म्हणाले की, प्रत्येकाच्या जीवनात महापुरुष भेटला पाहिजे.महापुरुषाचे शब्द अंतकरणाला भिडत असतात.महात्मे जे बोलतात त्यातून सर्वांचा उध्दार होत असतो. माणसाला देवाने कान दिले ते केवळ अलंकार घालण्यासाठी नाहीत तर ते भागवत कथा श्रवणसाठी आहेत. हात हे केवळ सोन्याचे ककन घालण्यासाठी नाहीत त्याने हाताची शोभा वाढते परंतु हातातुन दानाची सेवा घडली पाहीजे. भागवत गीता,व ज्ञानेश्वरी पारायण करणे अवघड आहे.प्रयत्न केल्यावर येणे अवघड नाही. परंतु त्यासाठी प्रयत्नाची गरज असतमे. म्हणूनच वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी असे म्हंटले आहे. पांडूरंग महाराज यांनी ज्ञानेश्वरी तोंडपाठ करून हे साध्य केले आहे.
म्हणून ज्ञानेश्वरी कळण्यासाठी ती आत्मसाथ करण्यासाठी जाणकार लोकात वाचली पाहिजे. देव देवा,संत सेवा,व देश सेवा करण्यासाठी आपले शरीर खर्च केले पाहिजे. ईश्वराची सेवा ज्याला घडते तो मनुष्यमाला जातो. म्हणून संत नामदेव महाराज सांगतात की आळंदीत नुसते वास्तव्य केले तरी आपल्यातील दोष निघून जातात. महात्म्यांच्या सहवासात माणुस आला तर त्याला आंनद मिळतो त्याच्या दुःखाचे होते. म्हणून महात्म्याचा सहवास माणसाला सुख देत असतो. महात्मा जरी हिमालयात असला तरी त्याच्या अंगावरील वाहुन आलेला वारा माणसावरील पातकाचा नाश करतो. म्हणून प्रत्येकाच्या जीवनात संत सेवा घडली पाहिजे. अखंड जप करणारे महात्मे क्वचितच सापडतात माणसाने चागला अभ्यास करावा असे काही नाही थोडा करावा परंतु तो पक्का अभ्यास केला पाहिजे ही सेवा करण्यासाठी अगोदर देवाची सेवा केली पाहिजे . या कीर्तनास लोणी व्यंकनाथ, महादेववाडी येथील भाविक मोठ्या संख्येने उपस्थीत होते.
-------------
दहीहंडी फोडून काल्याच्या कीर्तनाची सांगता
महादेववाडी येथे जेष्ठ वारकरी कालिंदी विश्वंभर पांडव यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्त २५ डिसेंबर २०२१ पासुन सुरू असलेल्या भागवत कथेची बबन महाराज मस्के यांच्या काल्याच्या कीर्तनाने सांगता झाली. यावेळी आळंदी येथील कीर्तनकार पांडूरंग महाराज क्षीरसागर, पाटील काका आळंदीकर, भागवताचार्य भुषण महाराज महापुरूष यांच्या हस्ते दहीहंडी फोडण्यात आली.
---------------
भागवत कथेची सांगता
श्रीगोंदा येथील भागवताचार्य भुषण महाराज महापुरूष यांनी भागवताचे निरूपण केले.सात दिवस भुषण महाराज यांनी भागवत कथेतील प्रत्येक प्रसंग आपल्या निरूपनात उत्कृष्ट पध्दतीने भाविकांसमोर मांडले. सांगतेच्या दिवशी तुळशीच्या हाराने कीर्तनकार बबन महाराज मस्के व पाटीलकाका आळदींकर यांचा विश्वंभर पांडव, प्रशांत पांडव, भुषणराव बडवे यांच्यासह
संतोष पांडव, प्रविण पांडव यांनी सत्कार केला
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.