By : Polticalface Team ,2024-12-06
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड,
दौंड ता ०६ डिसेंबर २०२४ दौंड तालुक्यातील मौजे यवत ता दौंड जि पुणे येथील ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी ६ डिसेंबर डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यवत ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच समीर दोरगे.माजी उपसरपंच व विधमान सदस्य नाथा आबा दोरगे. ग्रामविकास अधिकारी बालाजी सरोदे ग्रामपंचायतीचे सर्व कर्मचारी तसेच समस्त ग्रामस्थ उपस्थित होते.
६ डिसेंबर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त यवत ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच समीर दोरगे. उपसरपंच नाथा आबा दोरगे. ग्रामविकास अधिकारी बालाजी सरोदे यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच यवत ग्रामपंचायतीचे उपसरपंच सुभाष यादव यांनी यवत गावातील विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन भिम नगर येथे भेट दिली. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धवृत्ती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले,
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त यवत ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी बालाजी सरोदे यांनी मनोगत व्यक्त केले ते बोलताना म्हणाले डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून आम्ही भारताचे लोक असा विचार जगा समोर मांडला व समाजातील प्रत्येक घटकाला न्याय समता स्वातंत्र्य आणि बंधुता या संविधानाच्या चौकटीत राहून विषमता नष्ट करणे,व सामाजिक शैक्षणिक आणि राजकीय मुलभूत हक्क व नागरिकांचा अधिकार या सर्वभौम लोकशाही गणराज्य घटनेच्या माध्यमातून स्थापित केले, डॉ आंबेडकर यांच्या विचारांचा प्रभाव प्रतेक नागरिकांच्या जीवनात उमगल्या शिवाय राहणार नाही वाचायला तर वाचाल या युक्ति प्रमाणे यवत ग्रामपंचायतींमध्ये असलेल्या लॅब्रीमधील युवा नागरिकांनी पुस्तकांचे वाचन करावे असे आवाहन केले तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी एका समाजासाठी कार्य केले नाही, भारत देशातील सर्व घटकांतील व बहुजन समाजातील प्रत्येक घटकाला संविधानाच्या माध्यमातून समान संधी उपलब्ध करून दिली असल्याचे ग्रामविकास अधिकारी बालाजी सरोदे यांनी सांगितले
या वेळी आर पी आय आठवले गटाचे अनिल गायकवाड यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी यवत ग्रामपंचायतीचे सरपंच समीर दोरगे उपसरपंच नाथा आबा दोरगे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे माजी दौंड तालुका उपाध्यक्ष अनिल गायकवाड. यवत ग्रामपंचायतीचे कर्मचारी सचिन पवार पंपू काका अवचट सुनिल सापळे प्रकाश रणशुर उत्तम कांबळे आदी समस्त ग्रामस्थ मान्यवर उपस्थित होते