श्रीगोंदा तालुक्यात अवैध वाळू उपसा व डस्ट खडी विना रॉयल्टी सुरु तहसील समोर सोमवारी घंटानाद आंदोलन
By : Polticalface Team ,Fri Jan 07 2022 18:26:27 GMT+0530 (India Standard Time)
श्रीगोंदा:-तालुक्यातील नदी पट्यात य रात्रीच्या सुमारास वाळूचे मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर उत्खनन सुरू आहे. वाळूने भरलेले डंपर रातोरात मालाची वाहतूक श्रीगोंदा महसूल च्या हद्दीतून करीत आहेत. तहसीलदार प्रांत अप्पर जिल्हा अधीकारी गौण खनिज अधीकारी यांना पत्रकार स्थानिक नागरिकाने माहिती देऊन सुद्धा कारवाई करण्यास अधिकारी धजावत नाही.त्यामुळे महसूल मंत्री यांचे लक्ष वेद्न्यासाठी सोमवारी तहसील श्रीगोंदा समोर उपोषण व घंटा नाद आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती अनिल तुपे यांनी दिलीआहे.यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडीत जात आहे. अधिकारीवर्ग मात्र याकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष करीत असल्याने यामागे मोठे अर्थ कारण दडले असल्याचा दाट संशय व्यक्त होत आहे.
शासनाकडून अद्यापही वाळू उत्खननला बंदी आहे. सायंकाळ झाल्यानंतर येथे कोणीही फिरकत नाही. याचा फायदा भुरट्या वाळू चोरांनी उचलला आहे. वाळू काढल्यानंतर ती लगबगीने डंपरमध्ये भरून तालुक्यात ठिकठिकाणी पोहचवली जात आहे. गेले दोन महिने हा सारा खेळ रातोरात उरकला जात आहे,
मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणात वाळूचे उत्खनन होऊनही महसूलचे अधिकारी डोळेझाक का करीत आहेत? एकीकडे बेकायदेशीर वाळू उत्खनन केल्यास कारवाई केली जाईल, असे शासनाकडून जाहीर करण्यात आले आहे. परंतु श्रीगोंदा तालुकयात येथे होणारे वाळू उत्खनन संबंधित अधिका-यांच्या नजरेत येत नाही का? या अधिका-यांनी बघ्याची भुमिका का घेतली आहे? अधिका-यांचे वाळू व्यावसायिकांसमवेत साटेलोटे आहे असा डस्ट खडी तर् श्रीगोंदा तहसील समोरून बिंदस्तपणे दिवसा वाहतूक केली जात आहे तहसील दार यांना फोन केला कीं कार्रवाही करु असे फक्त असस्वासन दिले जाते पण कार्रवाही होत नाही
वाचक क्रमांक :