साईकृपाची काळजी नागवडेंनी करु नये आमदार पाचपुते.

By : Polticalface Team ,Sat Jan 08 2022 12:28:40 GMT+0530 (India Standard Time)

साईकृपाची काळजी नागवडेंनी करु नये आमदार पाचपुते. श्रीगोंदे :- श्रीगोंदे तालुक्यातील शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याची निवडणूक सध्या सुरू आहे. या निवडणुकीत काँग्रेसचे नेते राजेंद्र नागवडे विरुद्ध भाजपचे आमदार बबनराव पाचपुते अशी सरळ लढत होत आहे. हिरडगाव येथील पाचपुतेंचा साईकृपा साखर कारखाना बंद असल्याची टीका नागवडे यांच्याकडून होत आहे. या टीकेला आमदार पाचपुते यांनी उत्तर दिले काष्टी येथे सहकार विकास मंडळाच्या प्रचाराचा शुभारंभ झाला. त्या सभेत आमदार पाचपुते बोलताना म्हणाले की, आपण अनेक वर्षे मी मंत्री राहिलो. विधानसभा सभागृहात सर्वात वरिष्ठ आमदार आहे. अनेकांचे राजकारण जवळून पाहिले, मात्र राजेंद्र नागवडे यांनी केलेला भ्रष्टाचाराचा प्रताप पाहुन डोळे पांढरे झाले. माझ्या हिरडगाव येथील कारखाना बंद असल्याची चर्चा नागवडे करतात. त्यांनी ती काळजी करु नये हिरडगावचा कारखाना दोन दिवसांत सुरु होतोय. आता राजेंद्र नागवडेंनी स्वताची काळजी करावी, तुमच्या भ्रष्टाचारामुळे नागवडे कारखान्यात सत्तांतर होणार असल्याचा इशारा आमदार बबनराव पाचपुते यांनी दिला.फाईल पाहुन डोळे झाले पांढरे आमदार पाचपुते पुढे म्हणाले की, मी आजारी असल्याने कारखाना निवडणुकीतून अलिप्त राहण्याचा निर्णय मी घेतला होता. परंतु केशवराव मगर व त्यांच्या सर्वच सहकाऱ्यांना अगोदर तसे सांगितले होते. मात्र त्यांनी कारखान्यात सुरु असणाऱ्या राजेंद्र नागवडे यांच्या घोटाळ्यांची फाईल काळे कारनामे पुढे ठेवले व ते वाचून माझे डोळे पांढरे झाले. त्यानंतर कारखाना व पर्यायाने सभासदांना वाचविण्यासाठी आपण निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला.काळजी करु नका दोन दिवसांत साईकृपा कारखाना सुरु होणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यासाठी मदत केली आहे. मला ते मदत करीत असल्याचे खुद्द शरद पवार यांनाही सांगितल्याने आता सगळ्या अडचणी मिटल्या आहेत. आमची काळजी करु नका, तुम्ही केलेल्या घोटाळ्याचा पर्दाफाश होईल व त्याची चौकशी लागेल. त्यावेळी तुमची काय अवस्था होईल याची काळजी करा, असा इशाराही पाचपुते यांनी नागवडे यांना दिला.राजेंद्र नागवडेंना स्वताचा पराभव दिसत आसल्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळु सरकायला लागली आहे आपण कारखान्यात काय दिवे लावलेत हे संपुर्ण तालुक्याला माहीत आहे उमेदवार प्रतिभा पाचपुते म्हणाल्या, बबनराव पाचपुते माझ्यामुळे आमदार झाल्याचे राजेंद्र नागवडे सांगतात . त्यांनी तारतम्य ठेवून बोलावे. त्यांचा एवढा पायगुण चांगला होता की आमचे मताधिक्य चार हजारांवर आले. त्यांच्यामुळे आम्ही आमदार झालो तर त्यांच्याच वांगदरी गावात आम्ही मागे कसे राहिलो, याचेही उत्तर त्यांनी दिले पाहिजे. सहकारी कारखाना वाचविण्यासाठी आमची ही लढाई सुरु असून त्यात आम्हाला यश येईल, असे त्यांनी सांगितले.यावेळी केशवराव मगर, भगवानराव पाचपुते, अण्णासाहेब शेलार, दादा फराटे, सुवर्णा पाचपुते, संदीप नागवडे आदींची भाषणे झाली यावेळी तालुक्यातील जेष्ट कार्यकर्ते बाळासाहेब घोलप विठ्ठलराव येवले नवनाथ वाळुंज गणेश झीटे रमेश गीरमकर भाजप युवा नेते गोवर्धन नवले विशनुपंथ ईथापे महादेव दरेकर यांच्यासह आनेक सभासद हाजर होते तालुक्यात पाचपुते मगर यांच्या युतीला सभासदांकडुन प्रतिसाद वाढत आसल्यामुळेच राजेंद्र नागवडेंचा पराभव अटळ आसल्याची गरम चर्चा सभासदांमध्ये रंगताना दिसत आहे
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.