विना परवाना जिलेटीन व डिटोनेटर घेऊन फिरणारा ताब्यात.... स्थानिक गून्हे अन्वेश विभागाची करवाई...
By : Polticalface Team ,Sun Jan 09 2022 09:49:23 GMT+0530 (India Standard Time)
श्रीगोंदा :
श्रीगोंदा तालुक्यातील घोगरगाव शिवारात दुचाकी वरून अवैधरित्या विना परवा
ना जिलेटीन व डिटोनेटर घेऊन फिरत असलेल्या देवेंद्र प्यारेलालचंद शर्मा वय 30 रा . बाडी , राजस्थान हल्ली रा . भानगांव , ता . श्रीगोंदा याला स्थानिक गुन्हे अन्वेश विभागाच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी सापळा रचून ताब्यात घेत त्याचे कडून एका दुचाकी सह ३९ हजार ६५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात पो.हे.काँ बबन मखरे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणी सविस्तर माहिती अशी की स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना एक इसम घोगरगांव ते रुईखेल रोडवर दुचाकी क्र. एम एच 16 बीई 5186 यावरून अवैध रित्या जिलेटिनच्या कांड्या व डिटोनेटर विनापरवाना बेकायदेशिररित्या कब्जात बाळगून तिची वाहतूक करीत असल्याची माहिती मिळाली त्या नुसार घोगरगांव रुईखेल रस्त्यावर तरटेवस्ती जवळ सापळा रचत देवेंद्र प्यारेलालचंद शर्मा वय 30 रा . बाडी , राजस्थान हल्ली रा . भानगांव , ता . श्रीगोंदा याला ताब्यात घेतले अधिक चौकशी केली करत त्याचे कडील दुचाकीमधील डीक्की मध्ये तसेच एका पांढऱ्या गोणीमध्ये 5 हजार 400 रुपये किमतच्या प्लस्टिककोटेड जिलेटिन कांड्या, 4 हजार 250 रुपये किमतीच्या सोलर ए.ई.डी. डेटोनेटर तसेच 30 हजार रुपये किमतीची दुचाकी क्र. एम एच . 16 बीई 5186 असा एकूण 39 हजार 650 रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला. त्याचे कडे अधिक चौकशी करत त्याचेकडे स्फोटके बाळगण्याचा व वाहतूक करण्याचा परवाना आहे असे विचारले तर त्याने उडवाउडवीचे उत्तरे दिल्याने श्रीगोंदा पोलीस ठाण्यात पो.हे.काँ बबन मखरे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.
वाचक क्रमांक :