By : Polticalface Team ,14-12-2024
श्रीगोंदा (प्रतिनिधी) :- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे अंतर्गत श्रीरामपूर येथे दिनांक १२ डिसेंबर २०२४ रोजी झालेल्या आंतर विभागीय बॉडी बिल्डिंग स्पर्धेमध्ये महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयाचा बॉडी बिल्डर गणेश माणिक भोस याने ९० किलो वजन गटामध्ये उल्लेखनीय कामगिरी करून प्रथम क्रमांक मिळविला व त्याची अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी निवड झाली. गणेश याने मागील वर्षी कालिकत येथे झालेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ बॉडी बिल्डिंग स्पर्धेत ब्राँझ मेडल प्राप्त केले होते, तसेच नगर श्री व विद्यापीठ श्री चा बहुमान सुद्धा त्याने मागील वर्षी प्राप्त केला होता.
त्याच्या या यशाबद्दल महाविद्यालयीन विकास समितीचे चेअरमन माजी मंत्री बबनराव पाचपुते, रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य राहुलदादा जगताप, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य बाबासाहेब भोस, महावीर पटवा, प्र. प्राचार्य डॉ. महादेव जरे, उपप्राचार्य डॉ. प्रकाश साळवे, वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. सुदाम भुजबळ, सायन्स विभाग प्रमुख डॉ.नितीन थोरात, ज्युनिअर कॉलेजचे उपप्राचार्य प्रा. शहाजी मखरे व सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी गणेश भोसचे अभिनंदन केले व त्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या खेळाडूला शारीरिक शिक्षण संचालिका कल्पना बागुल, राष्ट्रीय पंच किरण पाटील (शिर्डी) आणि क्रीडा शिक्षक संजय डफळ यांचे मार्गदर्शन लाभले.
वाचक क्रमांक :