By : Polticalface Team ,Sun Jan 09 2022 09:52:29 GMT+0530 (India Standard Time)
पाथर्डी प्रतिनिधी:
पाथर्डी येथील बाबुजी आव्हाड महाविद्यालय आणि गांधी रिसर्च फाऊंडेशन, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात गांधी विचार संस्कार परीक्षा आयोजित केली होती.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. पी. ढाकणे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करतांना म्हटले की, गांधीजींचे सत्य, अहिंसा, समता या विचारांचीच समाजाला गरज असून गांधींजींचे आदर्शवत व्यक्तित्व जाणून घेणे आवश्यक आहे.राष्ट्रनिर्माण करण्यासाठी गांधीजींचे कार्य आजच्या पिढीने अभ्यासून तसेच आदर्शवत जीवन जगण्यासाठी गांधीजींचे विचार आचरणात आणले तरच समाज पुढे जाऊ शकेल आणि स्वतःच्या आयुष्यात आपण समाधानाने आनंदी जगू शकतो.
महाविद्यालयात मागच्या दहा वर्षांपासून या उपक्रमाचे आयोजन केले जाते. या वर्षी विद्यार्थ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. कनिष्ठ महाविद्यालयाचे ४९ तर वरिष्ठ महाविद्यालयचे ३० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
याप्रसंगी महाविद्यालयातील गांधी अध्यसन केंद्राचे प्रमुख प्रा. अर्जुन केरकळ, परीक्षेचे समन्वयक देवेंद्र कराड. संदीप आमटे, मनोज वखरे आदींची उपस्थिती होती.
वाचक क्रमांक :