यवत पुणे सोलापूर महामार्गावर मध्ये रात्री कंटेनरला भीषण आग. कंटेनरच्या कॅबिनमध्ये अडकून युवकांचा मृत्यू. नागरिकांच्या सहकार्याने आग आटोक्यात

By : Polticalface Team ,24-12-2024

यवत पुणे सोलापूर महामार्गावर मध्ये रात्री कंटेनरला भीषण आग. कंटेनरच्या कॅबिनमध्ये अडकून युवकांचा मृत्यू. नागरिकांच्या सहकार्याने आग आटोक्यात दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड. दौंड ता २४ डिसेंबर २०२४ यवत ता दौंड जिल्हा पुणे येथील पुणे सोलापूर महामार्गावर मध्ये रात्री एका कंटेनरला भिषण आग लागली ही घटना दि २३ रोजी रात्री २:२० वाजे दरम्यान घडली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या बाबत अधिक माहिती अशी की सोलापूर बाजुंकडून पुणे बाजुकडे कंटेनर नं. एच आर 38 ए डी 6426 जात असताना अचानक यवत येथील गणेश साळुंके यांच्या हॉटेल समोर कंटेनरच्या कॅबिन मध्ये आग लागून ती आग मागे कंनटेनर मध्ये वेगाने वाढत गेली हि घटना मध्ये रात्री घडली मात्र वेळी कंटेनर चालकाने आपला जीव मुठीत धरून खाली उडी मारुन कंटेनरच्या कॅबिन मधून बाहेर पडला. काही वेळातच आगिचे प्रमाण मोठ्या स्वरूपात रूपांतर झाले सोलापूर पुणे महामार्ग वाहतूक कोंडीने चक्काजाम झाल्याने यवत पोलीस घटनास्थळी पोहोचले वाहतूक कोंडी नियंत्रणात करत ऑइल टँकर दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. स्थानिक नागरिकांनी घरातील बोरवेलची मोटर चालू करून बादलीने पाणी टाकत आग विझवण्या प्रयत्न करीत असताना देखील आग आटोक्यात येत नव्हती वाशिंग सेंटरच्या पाईपने आग आटोक्यात आणण्यासाठी. अमर चोरगे. विक्रांत दोरगे धीरज सोनवणे. समीर अन्सारी आदी युवा तरुण प्रयत्न करीत होते. कंटेनरच्या कॅबिनमध्ये एक युवक झोपेत असल्याने अडकला असल्याची खबर होती अशा वेळी अग्निशामक गाडी जवळ असणे आवश्यक आहे मात्र दुर्दैवाने अग्निशामक गाडी कुरकुंभ एमआयडीसी या ठिकाणी असल्याने घटनास्थळी तात्काळ पोहोचणे शक्य नसल्याने यवत येथील स्थानिक नागरीक राहुल रमेश बनसुडे व रमेश माणिक बनसुडे यांनी पिण्याचे पाणी वाहतूक करणाऱ्या टँकरला अग्निशामक पंप बसवला असल्याची कल्पना असल्याने यवत येथील संदीप दोरगे यांनी बनसुडे यांना संपर्क साधला असता अग्निशामक पंप बसवलेले पाण्याची गाडी घटनास्थळी पोहोचली कंटेनरच्या पाठीमागील लोखंडी दरवाजा तोडून आतील आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केला यामध्ये कंटेनर चालक याचा दुसरा सहकारी प्रिन्स राजा सरूप परमाल वय 23 वर्षे रा.डोंगरकला ललीतपुर ता.पाली जि. ललीतपुर राज्य उत्तर प्रदेश हा कंटेनरच्या कॅबिनमध्ये जागीच मयत झाला झाल्याचे दिसून आले तसेच कंटेनर मध्ये नामांकित कंपन्यांच्या ( एअर कंडिशन ए सी ) मुद्देमालाचे जळून नष्ट झाल्याने लाखो रुपयांची नुकसान झाली आहे नागरीकांच्या सहकार्याने आग आटोक्यात आली यवत पोलीस स्टेशन अ.म.र.नं.258/2024 BNSS 194 प्रमाणे खबर देणार- आकिलखान फखरूद्दीन खान वय 23 वर्षे व्यवसाय ड्रायव्हर शिक्षण ८ वी रा.मु.पो.खंडेवाला ता.पाहडी जि.भरतपुर राज्य राजस्थान सदर घटनेमध्ये मयताचे नाव- प्रिन्स राजा सरूप परमाल वय 23 वर्षे रा. डोंगरकला ललीतपुर ता. पाली जि. ललीतपुर राज्य उत्तरप्रदेश म.घ.ता.वेळ व ठिकाण- दि.24/12/2024 रोजी रात्रौ.02.20 वा.चे सुमारास मौजे यवत गावचे हद्दीत गणेश साळुंखे यांचे हॉटेल समोर सोलापुर पुणे हायवे रोड येथे सोनु ट्रान्सपोर्टचा कंटेनर नं.एच.आर.38 ए डी 6426 ला आग लागल्याने एक युवक मयत झाला असुन वर नमुद केले तारीख वेळी व ठिकाणी यातील खबर देणार यांनी खबर दिली की, सोनु ट्रान्सपोर्ट फरीदाबाद यांचेकडे कंटेनर नं. एच आर 38 ए डी 6426 मध्ये यातील मयत कॅबिन मध्ये झोपलेला असताना अचानक कंनटेनरला आग लागल्याने त्यामध्ये जळुन जागीच मयत झाला आहे. वैगरे मजकुरच्या खबरी नोंद वरुन यवत पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली दाखल अंमलदार पोहवा चोरामले तपासी अंमलदार पोना शिंदे पुढील तपास करीत आहेत
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.