सवर्णांकडुन सतत होत असणाऱ्या त्रासाला कंटाळून मातंग समाजाचे वयोवृद्ध दाम्पत्य करणार 26 जानेवारी रोजी श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर उपोषण
By : Polticalface Team ,Mon Jan 10 2022 22:26:49 GMT+0530 (India Standard Time)
श्रीगोंदा प्रतिनिधी :-
श्रीगोंदा तालुक्यात दलितांवर नेहमीच अन्याय अत्याचार होत असतात हे काही नवीन नाही,जातियवाद तथा दलितांवर होणार्रा अन्याया बाबत श्रीगोंदा तालुका एक नंबर वर आहे...बहुतेक करुन दलितांवर होणारे अत्याचार हे शेती संदर्भातुनच होत आहेत..व त्यावर अंकुश आणण्यासाठी प्रशासन म्हणावे अशी उपाययोजना व ठोसपावले उचलताना कधीच दिसत नाही ही खुप मोठी शोकांतिका आहे..,त्या मुळे अन्याय अत्याचार कमी होण्या ऐवजी ते मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. जरी पोलीस यंत्रणा कारवाई करण्यास पुढे सरसावली तर सवर्णांकडुण त्यांचे नातेवाईक सोयरे धायरे लगेचच प्रशासनावर दबाव आणून खर्याच खोटं करून टाकतात तालुक्यातील नावाजलेली पुढारी मंडळी त्यांना राजकीय पाठींबा देऊन दबाब आणतात उलट पैशाच्या जोरावर दलित कुटुंबावरच पोलीस कारवाई ची धमकी देत तुमच्यावर गुन्हा दाखल करू असे त्या मुळे म्हणतात.असा हा प्रकार सर्रास श्रीगोंदा तालुक्यात घडताना दिसत आहे असाच काही प्रकार घडला आहे श्रीगोंदा तालुक्यातील अरणगाव दुमाला येथील मातंग समाजातील वयोवृद्ध असणारे श्री सुभाष सोनबा नेटके व त्यांच्या पत्नी लिलाबाई सुभाष नेटके या दलित वृद्ध दाम्पत्यावर.
सविस्तर वृत्त असे आहे की हे वयोवृद्ध दांपत्य शेती करून आपली उपजीविका भागवते,अरणगाव दुमाला येथे वेगवेगळ्या तीन ठिकाणी त्यांची सवर्णां शेजारी जमीन घेतलेली आहे, परंतु या ठिकाणी जमिन कसत असताना त्यांना दर वर्षी वेगवेगळ्या अडचणींना सामोरे जावे लागते. त्यांच्या स्वतःच्या शेतात गेले तरी शेजारील सवर्णांची लगत असणारे जमिनी वाले त्यांना जाणून बुजून त्रास देतात व जाती वरुन शिव्या देतात, तसेच काही वर्षांपूर्वी त्यांना शेजारील व्यक्तींकडून जीवे मारण्याचा प्रयत्नही झाला होता.तसेच त्यांच्या शेता कडे जाणारे कॅनल चे पाणी अडविण्यात आले होते, त्या शेतामध्ये उभे पिकामध्ये जनावरे घालणे पाण्याची पाईप लाईन फोडणे, या प्रकारामुळे त्यांनी ते क्षेत्र मिळेल त्या भावामध्ये विकून टाकले. त्यांच्या आता दुसरे शेतामध्ये उसाचे पीक असून दुसऱ्या बाजूचे लोक शेतामध्ये गाडी जाऊन देत नाही व रस्त्याच्या बाजूला जमिनीचा व रस्त्याच्या कडेला खूप मोठं खड्डा केलेला आहे त्यामुळे शेत माल मार्केटला नेणारे वाहनही शेतात मध्ये जात नाही त्यामुळे शेतातील उभी पीके शेतामध्येच आहे, त्यामुळे नेटके यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते आहे, तसेच त्या ठिकाणची शेतातील असणारे बांध तेथील शेजारी नेहमी फोडतात,पिकांचे नुकसान करतात झाडे मोडतात,त्याच प्रमाणे दुसऱ्या ठिकाणच्या क्षेत्रामध्ये बांधावरून नेहमी त्रास होत असल्यामुळे त्यांनी त्या क्षेत्रामध्ये साग,आंबा,नारळ इत्यादी झाडांची लागवड केली आहे, तरीदेखील शेजारील दोन्ही बाजूचे सवर्ण कुटुंब नेहमी त्रास देत असतात, बांध मोडतात, जातीवाचक शिव्या देऊन जीवे मारण्याची धमकी देतात, तसेच एक सवर्ण कुटुंबातील शेजारी त्याचा मुलगा सैन्यदलात असल्यामुळे तो म्हणतो मुलाच्या सैनिक दलातुनच तुझ्यावर केस टाकणार आहे,तसेच दुसरे अजून एक सवर्ण कुटुंब त्यांना त्यांच्या पदाधिकारी कुटुंबीयांची धमकी देऊन खोटी बलात्काराची केस टाकील अशी नेहमीच धमकी देत आहे असे सुभाष नेटके यांनी म्हणने आहे, तसेच महाराष्ट्र शासनाचे पाटबंधारे खात्याची असणारी खोली स्वतःच्या फायद्या करता वापर करणारा व्यक्ती,विज जोडणीसाठी पैसा वरुन वेढीस धरणारा कर्मचारी, रेशन दुकानातील अनेक त्रुटी,अशा एक-ना अनेक कारणां विषयी ते श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर उपोषण करणार आहेत. असे मातंग समाजाचे सुभाष नेटके यांनी निवेदनात म्हटले आहे. तसेच त्यांच्या या आंदोलनात अनेक द लित संघटनेंचा पाठिंबा देऊन भाग घेणार आहे.आहे असे सर्व दलित संघटनेंच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे..
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.