कालव्याचे पाणी पिंपळगाव, कोरडगाव, खरवंडी परिसरातील गावांना मिळावेत- बाळासाहेब ढाकणे
By : Polticalface Team ,Tue Jan 11 2022 10:52:29 GMT+0530 (India Standard Time)
पाथर्डी प्रतिनिधी:
मुळा धरणाचे पाणी साकेगांव, सुसरे शिवारामध्ये आले आहे. तेच मुळा धरण कालव्याचे पाणी प्रभु पिंपरी, पागोरी पिंपळगांव, सांगवी बुद्रुक, सांगवी खुर्द, माळेगांव, चांदगांव, वसुजळगांव, सोमठाणे नलवडे, भुतेटाकळी, कोरडगांव, औरंगपुर, कळसपिंपरी, जिरेवाडी, तोंडोळी, सोनोशी, दैत्यनांदुर, येळी, खरवंडी कासार, मालेवाडी, मुंगसवाडे, भालगांव परीससराला मिळण्यासाठी नवीन कालव्याच्या मंजुरीसाठी सर्वे करुन मंजुरी द्यावी, अशी मागणी परीसरातील शेतकऱ्यांच्या वतीने राष्ट्रीय शेतकरी युनीयनचे जिल्हाध्यक्ष तथा भाजपा किसान मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस शेतकरी नेते बाळासाहेब ढाकणे यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना पाठवलेल्या पत्राद्वारे केली आहे.
ढाकणे यांनी जयंत पाटील यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले की, पागोरी पिंपळगांव, कोरडगांव व खरवंडी परीसरातील गावे ही कायमस्वरूपी कोरडवाहु जिरायत क्षेत्रात येत असल्यामुळे सदरच्या भागात शेतकऱ्यांना उत्पन्नाचे दुसरे साधन नाही. शेतकऱ्यांना हलाखीचे जीवन जगावे लागत आहे व उत्पन्नाचे दुसरे साधन नसल्यामुळे मोठया प्रमाणात येथील शेतकरी ऊसतोडणीसाठी जातात. वर्षानुववर्षे येथील शेतकरी शेतीला पाणी नसल्यामुळे विकासाच्या प्रवाहातून बाहेर फेकले गेले आहेत. सदरचा परीसर विकासापासुन वंचीत राहिला आहे. सदरच्या परीसरातील शेतकऱ्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांच्या शेतीला बारामाही पाणी मिळण्यासाठी मुळा धरणाचे पाणी कालव्याद्वारे मिळण्यासाठी मंत्रीमहोदय साहेबांनी जातीने लक्ष घालुन या परीसराला वरदान ठरणाऱ्या नवीन कालव्याचा तातडीने सर्वे करुन शेतकऱ्यांसाठी कालव्यास मंजुरी देऊन व निधी उपलब्ध करून देऊन परीसरातील शेतकऱ्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणावेत, अशी मागणी परीसरातील शेतकऱ्यांच्या वतीने शेतकरी नेते बाळासाहेब ढाकणे यांनी जलसंपदा व लाभक्षेत्र मंत्री जयंत पाटील यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
यवत येथील मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांच्या रांगा. ईव्हीएम मशिन मात्र संत गतीने. उशीरा पर्यंत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क.
शरद पवारांच्या सभेला आणलेल्या खुर्च्या. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत वापरल्या. तालुक्यात होतेय चर्चा
श्रीगोंदयाच्या आमदारकीवर नागवडेंचाच सर्वाधिक नैतिक अधिकार.
श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात सुरू. यवत नगरीत भक्तीमय वातावरण.
श्रीगोंद्यात वंचित च्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी, 3 साखर सम्राट विरोधात सामान्य शेतकऱ्यांचे मोठे आवाहन, सभेचा विरोधकांनी घेतला धसका
श्रीगोंद्यात धनगर समाज नागवडे सोबत- कोल्हटकर
वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ आज 1वा.ॲड प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा.गर्दीचा नवीन विक्रम होणार
विक्रम पाचपुते यांनी लोकांची फसवणूक करत गुन्हेगारीत विक्रम करत विकास कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी प्रमाणात वसुली केली तर नागवडे यांच्या 15 खोक्यांनी माझ्या तिकीटाचा सौदा केला - राहुल जगताप
महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांना बहुमताने विजय करा निधी कमी पडून देणार नाही उद्धव ठाकरे
सौ अनुराधाताईंना नागवडेंना प्रचंड मताने निवडून द्या विकासाची हमी आम्ही घेतो- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत दौंड नगर परिषदेतर्फे सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन: मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे.
महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या उद्याच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता
श्रीगोंद्यात मतदान अधिकारी मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न
अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात
दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील
महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.
दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.
सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन
अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद