रमाई आवास घरकुल योजनेसाठी शासनाचे अनुदान १ लाख २० हजारात होत नाही घरकुल ? २ लाख ५० हजार अनुदानाची मागणी.

By : Polticalface Team ,11-01-2025

रमाई आवास घरकुल योजनेसाठी शासनाचे अनुदान १ लाख २० हजारात होत नाही घरकुल ? २ लाख ५० हजार अनुदानाची मागणी. दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड. दौंड ता ११ जानेवारी २०२५ दौंड तालुक्यातील मौजे यवत ता दौंड जिल्हा पुणे येथील ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सन २०१६-१७ ते २०२५ या कालावधीमध्ये अनेक घरकुल मंजूर करण्यात आले आहेत. महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने घरकुल बांधण्यासाठी १ लाख २० हजार रुपये तीन टप्प्यांत अनुदान दिले जाते. ही रक्कम घरकुल बांधण्यासाठी अपुरी पडत असल्याने घरकुल बांधकाम पूर्ण होत नाही. दौंड तालुक्यातील अनेक लाभार्थी मोल मजुरी रोजंदारी करून पोटाची खळगी भरण्यासाठी पराकाष्ठा करावी लागत आहे. बांधकाम क्षेत्रातील वाढती महागाई पाहता घरकुलाचे स्वप्न विरले जात असल्याचे चिंता दिवसेंदिवस वाढत चालली आहे.ग्राम संसद कार्यालय यवत प्रधानमंत्री आवास घरकुल योजना तसेच मोदी आवास घरकुल योजना आणि रमाई आवास घरकुल योजने अंतर्गत तब्बल १२५ पेक्षा अधिक लाभार्थी घरकुल बांधकाम करण्यासाठी प्रतिक्षा करीत आहेत. मात्र वाढत्या महागाईने कळस गाठला आहे. सिमेंट वाळू विट तसेच इतरही अनेक लागणाऱ्या वस्तूंचा वाढता दर वर्षीच्या तुलनेत अधिक वाढत चालला आहे. काही दिवसांपूर्वी या संदर्भात आमदार बच्चू कडू यांनी सरकार दरबारी घरकुल योजनेची पोल खोल करुन घरकुल योजनेसाठी वाढीव अनुदान मिळण्याबाबत सरकारचे लक्ष वेधून घेतले होते. त्याच प्रमाणे दौंड तालुक्यातील मौजे पिंपळगाव आमदार राहुल कुल, यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांचा मेळावा घेण्यात आला होता त्या वेळी आमदार राहुल कुल यांच्या हस्ते पूर्ण झालेल्या घरकुल लाभार्थ्यांना धनादेश देऊन पुढील काळात घरकुल योजनेचे अनुदान वाढीबाबत आश्वासन देण्यात आले होते. दौंड तालुका पंचायत समिती बांधकाम विभाग अधिकारी वर्ग तसेच स्थानिक ग्रामपंचायत अधिकारी यांच्या सुचनेनुसार दौंड तालुक्यातील काही लाभार्थीनी आपली झोपडी पाडून नवीन घरकुल बांधण्यासाठी सज्ज झाले मात्र वाढत्या महागाईमुळे लाभार्थीचे कंबरडे मोडून नाकी नऊ झाले असल्याचे दिसून येत आहे. घरकुल बांधकाम अर्धवट असल्याने घरातून आभाळात चंद्रमा पाहण्याची वेळ लाभार्थींवर आली आहे घरकुल बांधकामासाठी १ लाख २० हजार रुपये अनुदान अपुरे कमी पडत आहे. महागाईमुळे लाभार्थींची डोकेदुखी अधिक वाढली असुन पारा वाढल्याची चर्चा प्रत्येक गावात पाहायला मिळत आहे रमाई आवास घरकुल योजना. प्रधानमंत्री आवास घरकुल योजना. मोदी आवास घरकुल योजनेसाठी. महाराष्ट्र राज्य सरकारने अनुदान रक्कम २ लाख ५० हजार अनुदान जाहीर करण्याची मागणी केली जात आहे. सन २०१६-१७ पासून ग्राम संसद कार्यालय यवत तालुका दौंड जिल्हा पुणे ग्रामीण भागातील घरकुलांची सध्याची स्थिती पाहता घरकुल यादीतील अनेक लाभार्थी मयत झाले असल्याचे दिसून येत आहे. सन २०२३-२४ चालू वर्षात यवत ग्रामपंचायतीच्या घरकुल यादीमध्ये सरासरी १२५ लाभार्थींचा समावेश असुन घरकुलाच्या प्रतिक्षेत आहेत रमाई आवास घरकुल योजना बांधकाम सुरू करण्यासाठी शासनाने लाभार्थींच्या बँक खात्यात पहिला हप्ता १५ हजार रुपये जमा करून मासा गळाला गुंतवला असल्याचे बोलले जात आहे वरीष्ठ अधिकारी वेळोवेळी घरकुल बांधकाम सुरू करण्यासाठी लाभार्थींची भेट घेऊन चार्जीग करण्याचा प्रयत्न करीत आहेत घरकुलाचे बांधकाम सुरू करा ? कधी सुरू करणार ? अधिकाऱ्यांनी लाभार्थीच्या मागे भुंगा लावला आहे. १ लाख २० हजार अनुदानात घरकुलाचे बांधकाम पूर्ण होत नाही. याची जाणीव संबंधित अधिकारी यांना देखील आहे. लाभार्थींने स्वाता रोजगार हमी योजनेचा लाभ घेऊन बिगारी मजुरीचे काम केले तरी मजुरीची रक्कम लाभार्थीला मिळेल याची खात्री नाही. मागासवर्गीय वंचित वस्तीतील व्यक्तींना मोल मजुरी केल्या शिवाय एक वेळचे अन्न मिळत नाही. महागाई भरमसाठ वाढली आहे अशा परिस्थितीमध्ये घरकुल बांधकाम करणे म्हणजे गरीब कुटुंबाची परीक्षा घेतल्या प्रमाणे आहे. घर म्हणतं बांधुन बघ आणि मित्र म्हणतात लग्न करुन बघ या म्हणी प्रमाणे घरकुल लाभार्थीची परिस्थिती झाली आहे. मागील पंधरा वर्षांमध्ये प्रशासकीय सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना अनेक वेळा वेतन वाढ झाली. चौथे वेतन पाचवे वेतन सहावे वेतन सातवे वेतनात मोठ्या प्रमाणात शासनाने वेतनात वाढ केली आहे या बद्दल दुमत नाही. मात्र महाराष्ट्र राज्य सरकारने गोरगरीब मागासवर्गीय व वंचित समुद्राच्या डोक्यावरचे छत हिरावून घेतले आहे की काय असा प्रश्न उपस्थित झाल्या शिवाय राहत नाही गेली १५ वर्षापासून घरकुल योजनेसाठी अनुदान वाढ झाली नाही निवारा देणाऱ्या रमाई आवास घरकुल योजनेसाठी शंभर रुपये देखील अनुदानात वाढ केली नाही. हि अतिशय लाजिरवाणी शोकांतिका असल्याचे दिसून येत आहे. मागील १५ वर्षा पूर्वी पासून घरकुलांसाठी शासनाने १ लाख २० हाजार एवढेच अनुदान कायम ठेवले आहे. यामध्ये वाढ करण्याची अत्यंत आवश्यक आहे मात्र महाराष्ट्र राज्य सरकार या बाबत ठोस निर्णय का घेत नाही.हा खरा प्रश्न उपस्थित केला जात आहे राज्यातील अनेक उद्योजकांची कर्ज माफी केली जाते. अनेक शेतकऱ्यांच्या शेत मालाचे उत्पादन खर्च कमी जादा झाला की वादंग सुरू होते पिक कर्ज माफी केली जाते मात्र रमाई आवास घरकुल योजना प्रधानमंत्री आवास घरकुल योजना मोदी आवास घरकुल योजना अनुदान रक्कम या मध्ये वाढ केली जात नाही गोरगरीबांच्या परिस्थितीची थट्टा केली जात आहे महाराष्ट्र राज्य सरकारने घरकुल योजनासाठी दुप्पट अनुदान २ लाख ५० हजार रुपये अनुदानात वाढ करावी अशी मागणी दौंड तालुक्यातील वंचित समुहातील घरकुल लाभार्थींकडून केली जात आहे. दौंड विधानसभा मतदारसंघाचे आरोग्य दूत आमदार अँड राहुल कुल यांनी हा तारांकीत प्रश्न घेऊन राज्य सरकारचे लक्ष वेधावे घरकुल योजनेसाठी २ लाख ५० हजार रुपये अनुदान लाभार्थीला मिळाले पाहिजे अशी अपेक्षा लाभार्थी कडून व्यक्त केली जात असुन दौंड तालुक्यातील अनेक घरकुल लाभार्थीं आपले स्वप्न साकार करण्यासाठी धडपडत आहेत. दौंड तालुक्यातील शोषीत पिढीत व घरकुला पासून वंचित असलेल्या नागरिकांन कडून अपेक्षा व्यक्त केली जात आहे तसेच दौंड तालुक्यातील कोणीही गरीब कुटुंब घरा पासून वंचित राहू नये या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची भूमिका व तारांकीत प्रश्न सरकार दरबारी उपस्थित करावा रमाई आवास घरकुल योजना. प्रधानमंत्री आवास घरकुल योजना. मोदी आवास घरकुल योजना. लाभार्थींना अनुदानाची रक्कम २ लाख ५० हजार रुपये अनुदान मिळाले पाहिजे घरकुल योजनेतील लाभार्थी हे एस सी. एस टी. अल्प संख्यांक व इतर मागासवर्गीय समाजातील नागरिकांचा समावेश असल्याने गेली १५ वर्षा पासून महाराष्ट्र राज्य शासनाकडून घरकुलासाठी १ लाख २० हजार रुपये अनुदान दिले जात आहे यामध्ये बदल करणार की नाही ? याकडे राज्यातील घरकुल लाभार्थींचे लक्ष लागले आहे
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.