सोलापूर स्मार्ट सिटीचे प्रमुख अधिकारी गोपिचंद कदम यांचा तुळजा भवानी भोपे पुजारी समितीच्या वतीने केला सन्मान.
By : Polticalface Team ,11-01-2025
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड
दौंड ता ११ जानेवारी २०२५ दौंड तालुक्यातील मौजे आलेगांव (कदम वस्ती) ता दौंड जिल्हा पुणे येथील गावचे सुपुत्र मा गोपिचंद मुरलीधर कदम IAS. विशेष कार्यकारी अधिकारी (CEO) यांनी प्रशासकीय सेवेत उपजिल्हाधिकारी या पदावर कार्यरत असताना धुळे,अहिल्या नगर, पंढरपूर,श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर ट्रस्ट तसेच विविध मंत्र्यांचे (Osd) सचिव म्हणून मंत्रालय मुंबई अशा ठिकाणी अतिशय उत्कृष्ट कर्तव्याची अंमल बजावणी पार पडली असल्याचे सर्वत्र बोलले जात आहे. दौंड तालुक्यातील मौजे आलेगांवचा आदर्श स्वाभिमान असल्याने सांस्कृतिक सामाजिक शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील आणि गावकुसाल सर्वसामान्य नागरिकांना आणि उच्चशिक्षित विद्यार्थी मित्रांना प्रेरणा मिळत आहे.
सोलापूर महानगर पालिकेच्या कार्यालयात जाऊन शिवसेनेचे धाराशिव जिल्हा सहसंपर्क प्रमुख तथा श्री तुळजा भवानी भोपे पुजारी समितीचे अध्यक्ष अमर राजे कदम यांनी सोलापूर येथील नवनिर्वाचित मुख्य अधिकारी मा गोपिचंद मुरलीधर कदम IAS. विशेष कार्यकारी अधिकारी (CEO) यांच्या दालनात सदिच्छा भेट घेऊन पुष्पगुच्छ तसेच श्री तुळजा भवानी देविची प्रतिमा देऊन स्वागत करण्यात आले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या या भेटी दरम्यान श्री तुळजा भवानी मंदिर येथील जुन्या आठवणींना उजाळा देऊन आनंद व्यक्त केला तसेच देवस्थान ट्रस्टचे कामकाजा बाबत अनेक विषया संदर्भात चर्चा झाली.
स्मार्ट सिटी सोलापूर येथे IAS मा गोपीचंद कदम साहेब यांची विशेष कार्यकारी अधिकारी उपजिल्हाधिकारी (CEO) म्हणून नियुक्ती झाली आहे. या पूर्वी त्यांनी उद्योगमंत्री श्री.उदयजी सामंत आणि श्री.खाडे साहेब यांच्याकडे खाजगी सचिव म्हणून दमदार जबाबदारी पार पाडली आहे. उपविभागीय अधिकारी प्रांताधिकारी तसेच पंढरपूर विठ्ठल रूक्मिणी देवस्थान मध्ये ही विशेष कार्यकारी अधिकारी पदावर कामकाज पाहिले आहे त्यांच्या निर्भिड उज्वल कार्याचा अनुभवाचा सोलापूर शहराला निश्चितच फायदा झाल्या शिवाय राहणार नाही असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
वाचक क्रमांक :