By : Polticalface Team ,26-01-2025
लिंपणगाव (प्रतिनिधी):
बिघडलेली जीवनशैली, वातावरण व मानसिकता यामुळे आयुर्मान कमी झालेले आहे. आजची तरुण पिढी विविध प्रकाराच्या आजाराने जडली आहे. त्यासाठी तरुणांनी आपल्या आयुष्यात सुखी जीवन जगण्यासाठी आरोग्य जपले पाहिजे. आपल्या आयुष्यात तरुणांनी ध्येय निश्चिती करून त्याचा मागोवा घेऊन पुढे चालले पाहिजे. उत्तम आरोग्य हीच खरी संपत्ती आहे, असे प्रतिपादन श्रीगोंदा शहरातील प्रसिद्ध स्त्री रोगतज्ञ डॉ. विकास सोमवंशी यांनी केले.
श्रीगोंदा येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्यावतीने आयोजित राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिरात " युवकांचे आरोग्य" या विषयावर ते बोलत होते.
यावेळी नागवडे सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री. लक्ष्मणराव रायकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. विशेष उपस्थिती म्हणून श्री. सुभाष काका शिंदे, माजी व्हा. चेअरमन तथा विद्यमान संचालक नागवडे सहकारी साखर कारखाना हे होते. या कार्यक्रमासाठी सौ. नंदिनीताई वाबळे (काकी ) या अध्यक्ष म्हणून होत्या.
यावेळी डॉ. सोमवंशी म्हणाले की उत्तम आरोग्य घडवण्यासाठी युवकांनी आरोग्य सूत्रे पाळले पाहिजे. त्यामध्ये योग्य आहार, विहार, आराम, कसरत आणि निश्चय यांनी जीवन आनंददायी होते. माणसाचे जीवनाचे विविध टप्पे आहेत. प्राण्यांसारखे जीवन वेगवेगळ्या टप्प्यातून जात असते. जसे की, पहिला टप्पा माकडासारखा, दुसरा टप्पा माणसासारखा, तिसरा टप्पा बैलासारखा, अंतिम टप्पा वटवाघुळ सारखा असतो.
या व्याख्यानाचे नियोजन विद्यार्थी व विद्यार्थिनींनी केले. सूत्रसंचालन कु. सुद्रिक वैष्णवी व कु. तेजस्विनी सुपेकर या विद्यार्थिनींनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु. कदम शुभम याने, तर आभार रवींद्र भिसे याने केले.
या कार्यक्रमा प्रसंगी डॉ. मनन्मत लोहगावकर, डॉ. अभंग संदिप, प्रा. प्रशांत ढाके, प्रा. मनोहर उंडे हे उपस्थित होते.
या विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या सुरुवातीला स्वयंसेवकांनी गावात स्वच्छता मोहीम राबवली.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख डॉ. मनोहर सूर्यवंशी, प्रा. मिलिंद बेडसे, प्रा. कु. कोमल कांबळे, डॉ. सखाराम पारखे, प्रा. सागर रोडे,प्रा. दिपाली गायकवाड, प्रा. राजेश्री भागवत, प्रा. वैभवी साबळे, बाबा शिंदे यांनी प्रयत्न केले.
वाचक क्रमांक :