छत्रपती कॉलेजचा जिल्हाधिकाऱ्यांकडून गौरव, निवडणूक आयोगाकडून उत्कृष्ठ कामगिरी बद्दल दखल!

By : Polticalface Team ,26-01-2025

छत्रपती कॉलेजचा जिल्हाधिकाऱ्यांकडून गौरव, निवडणूक आयोगाकडून उत्कृष्ठ कामगिरी बद्दल दखल! लिंपणगाव ( प्रतिनिधी )महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाने श्रीगोंदा शहर व तालुक्यात नव मतदार नोंदणी, मतदार जनजागृतीसाठी पथनाट्य, पोस्टर मेकिंग अँड प्रेझेंटेशन स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा, प्रभात फेरी इत्यादींच्या माध्यमातून विशेष प्रयत्न केले व भारत निवडणूक आयोगाच्या स्वीप कार्यक्रमाची यशस्वी अंमलबजावणी केली. याबद्दल दिनांक २५ जानेवारी २०२५ रोजी राष्ट्रीय मतदार दिवसाच्या निमित्ताने महाविद्यालयाचा जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर येथे माननीय जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, महापालिका आयुक्त यशवंत डांगे, पोलीस अधीक्षक राकेश ओला साहेब व उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला. महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य डॉ. सतीशचंद्र सूर्यवंशी, महाविद्यालयातील निवडणूक साक्षरता मंडळाचे समन्वयक डॉ. संदीप अभंग आणि डॉ. संदीप कदम यांनी गुणगौरव पुरस्कार स्वीकारला. या यशाबद्दल छत्रपती शिवाजी संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र (दादा) नागवडे ,उपाध्यक्ष बाबासाहेब भोस, सौ. अनुराधाताई नागवडे, निरीक्षक सचिनराव लगड, सर्व विश्वस्त, महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.