परभणी येथे ६४ कोटीचा खाजगी कारखाना तसेच कराड येथे १ हजार टनी गुळाचा कारखान्यासारखे ६ खाजगी संस्था कश्या विकत घेतल्या याचे उत्तर नागवडे यांनी सभासदांना द्यावे - माजी मंत्री आ. बबनराव पाचपुते

By : Polticalface Team ,Wed Jan 12 2022 10:53:29 GMT+0530 (India Standard Time)

परभणी येथे ६४ कोटीचा खाजगी कारखाना तसेच कराड येथे १ हजार टनी गुळाचा कारखान्यासारखे ६ खाजगी संस्था कश्या विकत घेतल्या याचे उत्तर नागवडे यांनी सभासदांना द्यावे - माजी मंत्री आ. बबनराव पाचपुते श्रीगोंदा : आमचा नागवडे यांच्या खाजगी कारखान्याला विरोध नाही आम्ही देवदैठण येथील खाजगी कारखाना उभारताना लोकांकडून १० कोटींचे शेअर्स आणि १० कोटीचे कर्ज काढले तर हिरडगाव येथील साईकृपा कारखाना उभारताना आमच्या जमिनी, घर गहाण ठेवल्या आहेत मात्र ८ लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्या नागवडे यांनी परभणी येथे ६४ कोटीचा खाजगी कारखाना तसेच कराड येथे १ हजार टनी गुळाचा कारखान्यासारखे ६ खाजगी संस्था कश्या विकत घेतल्या याचे उत्तर नागवडे यांनी सभासदांना द्यावे असे माजी मंत्री आ. बबनराव पाचपुते यांनी काष्टी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत आवाहन करत नागवडे यांचा खरपूस समाचार घेतला.           या पत्रकार परिषदेस नागवडे कारखान्याचे माजी उपाध्यक्ष केशव भाऊ मगर, जेष्ठ नेते भगवान राव पाचपुते, गणपतराव काकडे, संदीप नागवडे, अनंता पवार उपस्थित होते.             पुढे बोलताना आ.पाचपुते यांनी सांगितले की स्व.शिवाजीराव नागवडे आणि माझ्यात राजकीय मतभेद होते मात्र आम्ही कधीही खालच्या पातळीवर जाऊन राजकारण केले नाही. राजकारणा नंतर आम्ही एकमेकांच्या सुख दुःखात सहभागी होत होतो. नागवडे कारखाना उभारताना सभासदांनी आपल्या घरातील किडुक मिडूक तसेच जनावरे विकून शेअर्स खरेदी केले आहेत. १ हजार रुपयांच्या शेअर्स साठी माझ्या वडिलांनी आमच्या दावणीची बैल जोड बाजारात विकली आहे. नागवडे कारखाना आमचा आहे सभासदांचा आहे तो टिकला पाहिजे कारण तो सभासदांच्या घामाच्या पैश्या तून तयार झाला आहे. अनेक सभासद मयत झाल्याने त्यांचे शेअर्स राजकीय हेतू पोटी अद्याप हस्तांतरित केले नाही. तर अनेक जण असे आहेत की त्यांचा उसच कारखान्याला नेला नसल्याने सभासद अडचणीत आले आहेत.कारखान्याच्या परिसरात उस उपलब्ध असताना कार्यक्षेत्राबाहेरून उस आणण्याचे कारण काय? रणांगण मोकळे करायचे आणि आपण जिंकलो असे म्हणण्याचे अशी पद्धत नागवडे यांची आहे.                   डीसलेरी प्रकल्प हा कारखान्याला जीवनदान देणारा प्रकल्प असून नागवडे हे डीसलेरीचे अध्यक्ष असताना मागील ८ वर्श्यापासून कारखान्यातील डीसलेरी प्रकल्प बंद कसा असा देखील आ.पाचपुते यांनी उपस्थित केला.     आपण सभासदांना २ रुपये किलो दराने सुरू केलेली साखर नागवडे यांनी बंद केली मात्र सभासद हा कारखान्याचा मालक असून त्यांना डिव्हिडंट हा विषय नसल्याने त्यांना प्रत्येक वर्षी २५ किलो साखर घरपोहच वाटप करणार असल्याचे सांगितले.                    नागवडे कारखान्यात होत असलेला घोटाळा मगर यांनी पुराव्यानिशी दाखविल्याने आपण त्यांना मदत करण्याचे ठरविले मात्र आपण मगर यांच्या सोबत नसल्याच्या विरोधक वावड्या उठवत असून आम्ही निवडणुक कार्यक्रम लागल्यानंतर केशवभाऊ मगर यांना अध्यक्ष करणार असल्याचे आगोदरच जाहीर केल्याने या वावड्यात कोणतेही तथ्य नसल्याचे आ.पाचपुते यांनी यावेळी जाहीर केले. चौकट :    नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी कारखान्याच्या मशनरी भंगाराच्या भावात दिल्या आणि ते देताना सुध्दा भंगार वाल्याला मैनेज केले. सभासदांच्या कारखान्यात असलेल्या ५५ कोटींच्या ठेवी राजेंद्र नागवडे हे बिनव्याजी वापरण्याचे कारण काय असा प्रश्न उपस्थित करत मागील वर्षी शेतकऱ्यांच्या उसाचा दर हा एफ. आर.पी. पेक्षा २१७ रुपयांनी कमी दिल्याने याचे उत्तरं नागवडे यांना या कारखान्याच्या निवडणुकीत सभासद देतील असे या वेळी माजी उपाध्यक्ष केशव भाऊ मगर यांनी सांगितले. चौकट :  नागवडे यांच्या ताब्यात असलेल्या शिक्षणं संस्था या कारखान्याच्या असून त्या संस्थावर असलेले डायरेक्टर यांना काढून टाकत त्यावर घरातील लोकांना कामाला लावले आहे. या शिक्षण संस्थाचे २०१७-१८ मध्ये २१ कोटी ४६ लाख ८६ हजार १९१ रुपयांचे ऑडिट होऊन कोट्यवधी रुपयांचे डोनेशन जमा झाले असताना देखील शिक्षणं संस्था १ कोटी १६ लाख रुपये तोट्यात दाखवत मोठा भ्रष्टचार केला आहे. या संस्थेचे ऑडिटर हे कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे यांच्या इतर संस्था मध्ये पार्टनर असल्याने त्यांनी त्यांच्या पद्धतीने ऑडिट रिपोर्ट तयार केलाच आरोप संदीप नागवडे यांनी पत्रकार परिषदेत केला.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

यवत येथील मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांच्या रांगा. ईव्हीएम मशिन मात्र संत गतीने. उशीरा पर्यंत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क.

शरद पवारांच्या सभेला आणलेल्या खुर्च्या. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत वापरल्या. तालुक्यात होतेय चर्चा

श्रीगोंदयाच्या आमदारकीवर नागवडेंचाच सर्वाधिक नैतिक अधिकार.

श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात सुरू. यवत नगरीत भक्तीमय वातावरण.

श्रीगोंद्यात वंचित च्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी, 3 साखर सम्राट विरोधात सामान्य शेतकऱ्यांचे मोठे आवाहन, सभेचा विरोधकांनी घेतला धसका

श्रीगोंद्यात धनगर समाज नागवडे सोबत- कोल्हटकर

वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ आज 1वा.ॲड प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा.गर्दीचा नवीन विक्रम होणार

विक्रम पाचपुते यांनी लोकांची फसवणूक करत गुन्हेगारीत विक्रम करत विकास कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी प्रमाणात वसुली केली तर नागवडे यांच्या 15 खोक्यांनी माझ्या तिकीटाचा सौदा केला - राहुल जगताप

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांना बहुमताने विजय करा निधी कमी पडून देणार नाही उद्धव ठाकरे

सौ अनुराधाताईंना नागवडेंना प्रचंड मताने निवडून द्या विकासाची हमी आम्ही घेतो- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत दौंड नगर परिषदेतर्फे सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन: मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे.

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या उद्याच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता

श्रीगोंद्यात मतदान अधिकारी मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न

अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात

दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील

महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.

दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.

सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन

अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद