स्व. बापूंचे स्वप्न साकारण्यासाठी राजेंद्र दादांना साथ द्या - भगवानराव कणसे

By : Polticalface Team ,Thu Jan 13 2022 10:11:31 GMT+0530 (India Standard Time)

स्व. बापूंचे स्वप्न साकारण्यासाठी राजेंद्र दादांना साथ द्या    - भगवानराव कणसे श्रीगोंदा:शेतकऱ्यांच्या मालकीचा नागवडे सहकारी साखर कारखाना या तालुक्याची कामधेनु आहे. स्व. बापूंनी मोठया कष्टाने उभारलेल्या या कारखान्यामुळे, तालुक्यातील शेतीचे मळे फुलले. अनेक गोरगरिबांचे प्रपंच सावरले. गेले पन्नास वर्षे बापूंनी हा कारखाना तळ हातावरल्या फोड प्रमाणे जपला. कारखान्याच्या माध्यमातून कष्टकरी शेतकऱ्यांच्या विकासाचे स्वप्न बापूंनी उराशी बाळगले. स्व. बापूंचे ते स्वप्नं साकार करण्यासाठी राजेंद्र दादा नागवडेंच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा. बापूंनी केलेल्या उपकरातून उतराई होण्यासाठी किसान क्रांती पॅनेला मतदान करा. हीच खरी बापूंना सभासदनी वाहिलेली श्रद्धांजली ठरेल. अशी भावनिक साद पेडगावचे सरपंच भगवानराव कणसे यांनी कारखाना सभासदांना घातली आहे. भीमानदी पट्यातील सभासदांशी संवाद साधताना श्री भगवानराव कणसे म्हणले की, आम्ही तीस वर्षे पासुन स्व. बापू आणि नागवडे कुटुंबाचे काम जवळून अनुभवले आहे. बापूंचा सामजिक कार्याचा वारसा राजेंद्र दादा भक्कमपणे पुढे चालवत आहेत. मात्र स्वराज्याच्या इतिहासात ज्या प्रमाणे शिवाजी महाराजां नंतर सत्ता लोभी अनाजी पंत आणि त्यांच्या टोळीने संभाजी राजांना बदनाम करून सत्ता हडप करण्याचे कट कारस्थान रचले होते, तसेच कट कारस्थान विरोधाकांच्या टोळीने राजेंद्र दादाच्या विरोधात रचले आहे. या टोळीत भिन्न पक्षाचे भिन्न विचारांचे लोक केवळ सत्ता उपभोग्यास एकत्र आले आहेत. राजेंद्र दादाना बदनाम करण्यासाठी खोटे भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत. विरोधकाचा बोलाची कडी बोलाचा भात आहे. खरंतर सहकारातील गैरकारभारास संपुर्ण संचालक मंडळ जबाबदार धरले जाते. कारखान्यात खरोखरच काही काळबेर चालू होते तर मग उपाध्यक्ष व संचालक डोळे मिटून का गप्प बसले होते? आता निवडणूकित भ्रष्टाचाराचे पुस्तकं आणि खोटे पुरावे घेऊन सभासदांना दाखवता मग हेच पुरावे घेऊन सहकार खात्याकडे गैर कारभाराच्या तक्रारी का दाखल केल्या नाहीत? विरोधकानीं विरोधाची भूमिका घेतली यात नवल नाही. वाईट याचे वाटते की, केशवभाऊ मगर सारखा माणुसही स्वार्थासाठी नितीभ्रष्ट झाला. वाटले होते 76 वर्षे वय असणारे केशव भाऊ दादांना मार्गदर्शक होऊन आधार देतील. 40 वर्षे शिवाजीराव नागवडे या देव माणसाच्या संगतीत राहूनही भाऊ तुम्ही शेवटी सूर्याजी पिसाळ झाला. शब्दांला जगणारा नेता म्हणून ज्या शिवाजीराव नागवडेंची उभ्या महाराष्ट्रात ओळख आहे त्यांच्या पासून शिकला तरी काय?... मित्रहो, विरोधाकांचा हेतू शुद्ध नाही. सहकारी साखर कारखाना हा काही राजकारणचा अड्डा नाही. कारखान्याचा संबंध थेट शेतकऱ्यांच्या प्रपंचाशी असतो. निवडणूका होतील. सत्ता येईल जाईल. पण कष्टाने उभा केलेला हा कारखाना ज्याच्यावर अनेकांची रोजी रोटी अवलंबून आहे तो टिकला पाहिजे. म्हणून मायबाप सभासदना हात जोडून विनंति करतो, विरोधाकांच्या भूलथापांना किंवा आमिषाला बळी पडू नका. आपणास पुण्य नाही करता आले, तरी निदान पापाचे वाटेकरी होऊ नका. नागवडें कुटुंबावर विश्वास ठेवा. किसान क्रांती पॅनेला साथ द्या. आणि फक्त छत्रीलाच मत द्या.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.