बिबट्याचा हल्ला एक जन जखमी परिसरात दहशतीचे वातावरण
By : Polticalface Team ,04-02-2025
श्रीगोंदा प्रतिनिधी रविवार दिनांक 2 रोजी सायंकाळी आठच्या सुमारात शेडगाव येथील रहिवासी असलेले सलीम झेंडे वय 45 गावच्या आठवडा बाजार उरकून आपल्या दुचाकीवरून शेडगाव कडून त्यांच्या वस्तीकडे जात असताना अचानक बिबट्या ने त्यांच्यावर हल्ला केला बिबट्या च्या हल्ल्यात सलीम झेंडे यांच्या पॅंटचा तुकडा बिबट्या च्या तोंडात तुटुन गेला व रस्त्याने जात असलेल्या ऊसतोड कामगारांनी आरडा ओरडा केल्यामुळे ते बालबाल बचावले आहेत श्री झेंडे यांच्या पायावर बिबट्या चे नखे लागल्याने त्यांना उपचारासाठी शासकीय ग्रामीण उप रुग्णालय आढळगाव येथे दाखल केले असता झेंडे यांना रुग्णालयात लस देवुन घरी पाठवण्यात आले आहे ते सध्या खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत शेडगाव टाकळी पेडगाव ग्रामस्थांनी वेळोवेळी वन विभागच्या अधिकार्यांना माहिती देऊन ही वनविभागाने कसलीही तत्परता दाखवली नाही आज दै लोकनेता चे प्रतिनिधी ज्ञानेश्वर येवले यांनी वनखात्याच्या अधिकार्यांसी संपर्क साधला असता पिंजरा तातडीने लावण्याचे आश्वासन दिले आहे परंतु पिंजरा आणण्यासाठी वनविभागा कडे वाहनं उपलब्ध नाही ज्या गावात पिंजरा लावायचा आहे त्या गावच्या सरपंचांनी वाहन उपलब्ध करून देण्याचे वनविभागा कडुन सांगण्यात आले आहे गेल्या दोन दिवसात अनेक ठिकाणी बिबट्याचे दर्शन झाले आहे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून वन विभाग याकडे का दुर्लक्ष करीत आहे असा सवाल सर्वसामान्य जनतेला पडत आहेजर पिंजरा आणण्यासाठी वनविभागा कडे वाहनं उपलब्ध नसेल तर ही वनविभागाची मोठी शोकांतिका आहे वनविभागाला पिंजरा ने आन करण्यासाठी तालुक्यांचे लोकप्रतिनिधी आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी लक्ष घालून वनविभागाला पिंजरा वाहतूक करण्यासाठी एक वाहन उपलब्ध करून देण्याची मागणी शेडगाव टाकळी पेडगाव परीसरातील जनतेमधून होत आहे .
वाचक क्रमांक :