केशवभाऊ मगर यांच्या गाडीच डिझेल ही बंद केल्याने याचा राग येऊन त्यांनी उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला - राजेंद्र नागवडे

By : Polticalface Team ,Thu Jan 13 2022 12:21:58 GMT+0530 (India Standard Time)

केशवभाऊ मगर यांच्या गाडीच डिझेल ही बंद केल्याने याचा राग येऊन त्यांनी उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला - राजेंद्र नागवडे प्रतिनिधी /श्रीगोंदे ,माजी मंत्री ,आमदार बबनराव पाचपुते यांच्या हाती सभासदांनी १९८४ साली नागवडे सहकारी साखर कारखान्याची सत्ता दिली होती.त्यांच्या कालावधीत पाचपुते यांनी कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केला होता या भ्रष्टाचारचा ढीगारभर पानांचा बायस अहवाल तयार झाला होता तसेच औटीवाडी येथील सहकारी कुकुट पालन संस्था सुरू केली होती तेथील कोंबड्यांची पखाडे देखील या महाशयांनी शिल्लक ठेवली नाही. तसेच त्यांच्या सोबत असलेले कारखान्याचे माजी उपाध्यक्ष केशव मगर यांना वाटायचे की स्व.बापू नंतर मलाच कारखान्याचे अध्यक्ष करावे हा हट्ट तसेच छत्रपती कॉलेज मधील मेस मध्ये निकृष्ट जेवण देत असल्याने त्यांचे जेवणाचे टेंडर रद्द केले तसेच त्यांच्या गाडीच डिझेल ही बंद केल्याने याचा राग येऊन त्यांनी उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आणि स्वार्थासाठी लुटारुंच्या टोळीला एकत्र घेऊन कारखाना लुटीसाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरले असल्याची खरपूस टीका नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी श्रीगोंदे येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. आज दि.१२ रोजी श्रीगोंदे येथील सोनिया गांधी पॉलिटेक्निक येथे नागवडे कारखान्याच्या निवडणुकीच्या सांगता सभेच्या निमित्ताने कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की माजी मंत्री बबनराव पाचपुते यांना आपला खाजगी कारखाना चालविता येईना तर ते सहकारी कारखाना काय चालवणार , सहकारी कारखाना हा गोरगरीब ऊस उत्पादक शेतकऱ्यांची कामधेनू आहे त्यावरच त्यांचे प्रपंच चालत असल्याने स्व.बापूंनी आपले आख्खे आयुष्य खर्ची घातले. या कारखान्याच्या माध्यमातून शिक्षण संस्था उभारल्याने गोरगरिबांची मुले उच्च शिक्षित झाली आहेत त्यांचाच आदर्श डोळ्यासमोर ठेऊन मी देखील गोरगरीब ,ऊस उत्पादक , सभासद यांची सेवा करत आहे. त्यामूळेच सभासदांच्या आशीर्वादामुळे विरोधकांच्या चारी मुंड्या चीत करणार यात शंका नाही .मात्र हा शेतकऱ्यांच्या मालकीचा कारखाना ताब्यात घेण्यासाठी कारखान्याचे माजी उपाध्यक्ष केशव भाऊ मगर यांना बापू नंतर मलाच अध्यक्ष करावे अशी त्यांची इच्छा होती मात्र त्यांची ती इच्छा पूर्ण होणार नसल्याचे लक्ष्यात आले आणि त्यातच छत्रपती कॉलेज मधील मेस मध्ये निकृष्ट जेवण देत असल्याने त्यांचे जेवणाचे टेंडर रद्द झाल्याने आणि त्यांच्या गाडीच डिझेल कारखान्याच्या पैशातून बंद केल्याने याचा राग येऊन त्यांनी उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आणि स्वार्थासाठी पाचपुते यांच्याशी सलगी करत आण्णासाहेब शेलार, जीजबापू शिंदे यांच्या सारख्या चांडाळ चौकडीसारख्या लुटारुंच्या टोळीला एकत्र घेऊन कारखाना लुटेसाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरले असुन होणाऱ्या निवडणुकीत सभासद त्यांना त्यांची जागा दाखविल्या शिवाय राहणार नाहीत. केशव मगर यांनी मागील काही दिवसांपासून माझ्यावर अनेक तथ्य हिन आरोप केले आहेत. केलेल्या आरोपापैकी कोणताही एक आरोप पुरव्या सहित सिद्ध करावा असे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले. चौकट = अण्णासाहेब शेलार यांना 15 वर्ष कारखाना चे संचालक केले पण ते कधीच मीटिंग ला हजर राहत नव्हते मग त्यांना आत्ता कारखाना कश्याला पाहिजे उलट त्यांनी पंचायत समितीच्या निवणुकीत त्यांनी लाखो रुपयांची तडजोड केली आहे अश्या लफांगेबाज सोंगाड्याला सभासद धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत असे राजेन्द् नागवडे यांनी सांगितले . चौकट = माजी मंत्री आमदार बबनराव पाचपुते , केशवराव मगर , अण्णासाहेब शेलार , जिज्याबापू शिंदे, यांची टोळी ही लुटारूंची असून त्यांना शेतकरी , ऊसउत्पादक व सभासद यांचे काही देणघेणे नाही या लबाड लोकांना उद्याच्या निवडणुकीत धडा शिकवा असे नागवडे यांनी आवाहन केले .
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.