शिक्षक व प्राध्यापकांच्या प्रश्नांसाठी झगडणारी एकमेव संघटना - प्रा.प्रदिप रोडे
By : Polticalface Team ,Thu Jan 13 2022 21:05:27 GMT+0530 (India Standard Time)
आष्टी :दि.१३ (प्रतिनिधी) आष्टी तालुका मुप्टा संघटनेची सहविचार सभा दि.१२ जानेवारी २०२२ रोजी सायंकाळी ६ वा.जगताप क्लासेस,मार्केट यार्ड,आष्टी येथे संघटनेचे सक्रीय सभासद तथा राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक राजेंद्र लाड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.या सहविचार सभेस प्रमुख मार्गदर्शक म्हणून मुप्टा संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष प्रा.प्रदिप रोडे,मुप्टा संघटनेचे उर्दु विभागाचे राज्यसचिव शाहेद कादरी,मुप्टा संघटनेचे जेष्ठ नेते प्रा.राम गायकवाड,प्राचार्य सुनिल शिंदे उपस्थित होते.यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून मुप्टा संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष प्रा.प्रदिप रोडे यांनी संघटनेची स्थापना,संघटनेने आजतागायत केलेली कामे,कोरोना काळात मृत पावलेल्या सभासदांना केलेली आर्थिक मदत,संघटना बांधणी संदर्भात तसेच शिक्षक व प्राध्यापकांच्या समस्या बाबत सविस्तर माहिती देवून शिक्षक व प्राध्यापकांच्या प्रश्नांसाठी झगडणारी मुप्टा ही एकमेव संघटना आहे असे सांगून रविवार दि.१६ जानेवारी २०२२ रोजी स.११ वा.तुलसी इंग्लिश स्कूल,संत ज्ञानेश्वर नगर,शासकीय आयटीआय मागे बीड येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय महत्त्वपूर्ण बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी प्रथमतः माँ.जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन करण्यात आले.तद्नंतर सहविचार सभेचे अध्यक्ष व प्रमुख मार्गदर्शक यांचा आष्टी तालुका मुप्टा संघटनेच्या वतीने पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.मुप्टा संघटनेचे तालुकाध्यक्ष श्रीरंग पवार यांनी सहविचार सभेचे प्रास्तविक केले.प्रास्तविकात त्यांनी आजपर्यंत आष्टी मुप्टा ने केलेल्या कार्याचा लेखाजोका मांडला.तसेच संघटनात्मक बांधणी,शिक्षक व प्राध्यापकांच्या विविध समस्या निराकारणाबाबत सखोल माहिती दिली.
तसेच यावेळी प्रा.राम गायकवाड यांनी संघटनेची ध्येय धोरणे,संघटना काय असते व काय करु शकते याबाबत मार्गदर्शन केले.मुप्टा संघटनेचे उर्दु विभागाचे राज्यसचिव शाहेद कादरी यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की,उर्दु विभाग राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यात मोठ्या जोमाने व ताकदीने काम करत असून उर्दु विभागातील शिक्षक व प्राध्यापकांच्या समस्या निराकारण करण्यासाठी मोठा लढा देत असून अनेक प्रश्नांचा उहापोह करुन अनेक प्रश्न तात्काळ सोडविलेले आहेत.यामुळेच मुप्टा संघटना ही एक मोठी ताकद असून यामध्ये सर्वांनी सामील होण्याची अत्यंत गरज आहे.तसेच याप्रसंगी प्राचार्य सुनिल शिंदे यांनी मुप्टा संघटनेत सामील होवून तन,मन,धनाने सहकार्य करावे असे आवाहन केले.शेवटी अध्यक्षीय समारोपात राजेंद्र लाड यांनी सांगितले की,मुप्टा ही संघटना नसून ही एक शिक्षक व प्राध्यापकांच्या समस्या सोडविणारी चळवळ आहे.या चळवळीत शिक्षक व प्राध्यापकांनी तन,मन,धनाने सामील व्हावे.वेगवेगळ्या कार्यालयात मुप्टा संघटना म्हटले की,नावानेच कित्येक कामे होतात.एवढी मोठी ताकद मुप्टा संघटनेने निर्माण केलेली आहे.यामुळेच बीड जिल्ह्यातील अनेक प्राध्यापकांची व शिक्षकांची कामे पूर्णत्वास गेलेली आहेत.तेंव्हा अशा एका कर्तव्यदक्ष संघटनेत सर्वांनी सामील होवून आपले प्रश्न सोडवून घ्यावेत असेही आवाहन राजेंद्र लाड यांनी शेवटी केले.या सहविचार सभेचे बहारदार सुत्रसंचलन प्रा.नामदेव वाघुले यांनी केले तर आभार प्रा.सय्यद बशिर यांनी मानले.सदरील सहविचार सभेस प्रा.बाळासाहेब काकडे,प्रा.डाँ.एस.डी.ओव्हाळ,स्वामी विवेकानंद पतसंस्थेचे उपाध्यक्ष सुभाष भादवे,ए.आर.पाचारणे,किरण खंडागळे,आर.एम.निकाळजे,प्रा.ए.एन.गायकवाड,प्रा.आर.के.सोनवणे,भा.द.जगताप,पत्रकार आण्णासाहेब साबळे आदी पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.संघटनेच्या कार्यक्रमासाठी हाँल उपलब्ध करुन दिल्याबद्दल भा.द.जगताप यांचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले.सहविचार सभेत कोवीडचे सर्व नियम पाळण्यात आले.शेवटी चहापान घेवून सहविचार सभा संपन्न झाली.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
यवत येथील मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांच्या रांगा. ईव्हीएम मशिन मात्र संत गतीने. उशीरा पर्यंत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क.
शरद पवारांच्या सभेला आणलेल्या खुर्च्या. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत वापरल्या. तालुक्यात होतेय चर्चा
श्रीगोंदयाच्या आमदारकीवर नागवडेंचाच सर्वाधिक नैतिक अधिकार.
श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात सुरू. यवत नगरीत भक्तीमय वातावरण.
श्रीगोंद्यात वंचित च्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी, 3 साखर सम्राट विरोधात सामान्य शेतकऱ्यांचे मोठे आवाहन, सभेचा विरोधकांनी घेतला धसका
श्रीगोंद्यात धनगर समाज नागवडे सोबत- कोल्हटकर
वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ आज 1वा.ॲड प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा.गर्दीचा नवीन विक्रम होणार
विक्रम पाचपुते यांनी लोकांची फसवणूक करत गुन्हेगारीत विक्रम करत विकास कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी प्रमाणात वसुली केली तर नागवडे यांच्या 15 खोक्यांनी माझ्या तिकीटाचा सौदा केला - राहुल जगताप
महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांना बहुमताने विजय करा निधी कमी पडून देणार नाही उद्धव ठाकरे
सौ अनुराधाताईंना नागवडेंना प्रचंड मताने निवडून द्या विकासाची हमी आम्ही घेतो- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत दौंड नगर परिषदेतर्फे सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन: मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे.
महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या उद्याच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता
श्रीगोंद्यात मतदान अधिकारी मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न
अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात
दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील
महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.
दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.
सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन
अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद