स. म.नागवडे कारखान्यात राजेंद्र नागवडे यांनी गड राखत केला दिग्गजांचा पराभव

By : Polticalface Team ,Sun Jan 16 2022 10:52:11 GMT+0530 (India Standard Time)

स. म.नागवडे कारखान्यात राजेंद्र नागवडे यांनी गड राखत केला दिग्गजांचा पराभव श्रीगोंदा : सहकार महर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत स्व. शिवाजीराव बापू नागवडे यांचे चिरंजीव विद्यमान अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांच्या किसान क्रांती पॅनेलने पाचपुते मगर गटाच्या सहकार विकास पॅनेलचा धुव्वा उडवत भाजपचे आमदार बबनराव पाचपुते यांच्या पत्नी डॉ. प्रतिभा पाचपुते, माजी उपाध्यक्ष केशवभाऊ मगर, भाजपचे खासदार विखे समर्थक अण्णासाहेब शेलार, भगवानराव पाचपुते, जिजाबापु शिंदे, वैभव पाचपुते या दिग्गजांचा धुव्वा उडविला. सहकार महर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ही अटीटतीची झाली. या मुळे २१ जागांसाठी दि.१४ रोजी १९८८२ मातदानापैकी १६९७९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. शनिवार दि.१५ रोजी सकाळी ८ वाजता सुरू झालेल्या मतमोजणीत संध्याकाळी ७ वाजेपर्यंत श्रीगोंदा गटात नागवडे गटाचे - शिंदे सुभाष ९९७०, भोस बाबासाहेब ९८७४, बेलवंडी गटात लबडे भीमराव ९४३७ , रायकर लक्ष्मण ९९७०, काकडे दत्तात्रय ९९७३ टाकळी कडेवळीत गटात नागवडे गटाचे नेटके भाऊसाहेब ९८६०, दरेकर प्रशांत ९९५९, रसाळ सुरेश ९७२३ लिपणगाव गटात जंगले विठ्ठल ९५४८, गिरमकर जगन्नाथ ९८९२, शिपलकर प्रशांत ९३१४ हे विजयी झाले, तर सेवा संस्थेत राजेंद्र नागवडे यांनी २५ मते घेऊन दणदणीत विजय मिळविला. १० गटपैकी पैकी ४ गटांची मतमोजणी पूर्ण झाली होती. उर्वरित ६ गटांची मतमोजणी रात्री उशिरा पर्यंत सुरू होती. एकंदरीत निवडणुकीचा कल पाहता नागवडे यांनी २१ - ० केल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. चौकट : नागवडे सहकारी साखर कारखाना शेतकऱ्यांची कामधेनू आहे. परंतु तालुक्यातील विघ्न संतोषी नेते मंडळींनी एकत्र येऊन शेतकऱ्यांची कामधेनू हिसकावून घेण्यासाठी आमच्या विरोधात पॅनल तयार करत आमच्यावर खोटे नाटे आरोप केले परंतु ही निवडणूक सभासदांनी च हातात घेऊन लुटारू टोळीला घरी बसविण्याचे काम केले. हा विजय बापूंच्या विचारावर विश्वास ठेवणाऱ्या सभासदांचा आहे अशी प्रतिक्रिया राजेंद्र नागवडे यांनी दिली. चौकट : कारखान्याच्या निवडणुकीत विरोधी पार्टी ने नागवडे कुटुंबावर अतिशय खालच्या पातळीवर जाऊन टीका टिपण्णी करत आरोप केले पण स्व.बापूंच्या विचारावर विश्वास असल्याने आजचा विजय हा खऱ्या अर्थाने बापूंच्या विचाराचा विजय आहे अशी प्रतिक्रिया जिल्हा बँक संचालिका अनुराधा नागवडे यांनी दिली. चौकट : मतदारांनी दिलेला कौल आम्हाला मान्य आहे. कारखाना मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला तो आम्ही सभासदापर्यांत पोहोचविण्याचे काम केले कारखाना वाचवा यासाठी पॅनल उभा केला मात्र सभासदांनी नागवडे यांच्यावरच विश्वास ठेवला आमचा झालेला पराभव मान्य असून माझी जो पर्यंत हात पाय चालतात तो पर्यंत राजकारणात सक्रिय राहणार असल्याची प्रतिक्रिया सहकार पॅनल चे नेतृत्व करणाऱ्या केशवभाऊ मगर यांनी दिली. चौकट : या निवडणुकीत भाजपचे माजी मंत्री आमदार बबनराव पाचपुते यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार विकास पॅनल मध्ये त्यांच्या पत्नी डॉ.प्रतिभा पाचपुते ..... यांचा मतांनी पराभव झाला. तर नेतृत्व करणारे केशव भाऊ मगर यांचा १८३४ मतांनी पराभव झाला मग तसेच माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष आण्णासाहेब शेलार यांचा २५६५ मतांनी पराभव झाला. कारखाना माजी उपाध्यक्ष जीजबापु शिंदे यांचा २९८६ मतांनी पराभव झाला. विद्यमान संचालक तुळशीराम रायकर त्यांचा २९५१ मतांनी पराभव झाला. तसेच भगवानराव पाचपुते यांचा.....मतांनी पराभव झाला. मार्केट कमिटीचे माजी उपाध्यक्ष वैभव पाचपुते यांचा..... मतांनी पराभव झाला. सोसायटी मतदार संघात बाजार समितीचे माजी सभापती प्रवीणकुमार ( बाळासाहेब ) नाहाटा यांना अवघ्या ५ मतांनी पराभवास सामोरे जावे लागले.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.