ज्या भागात कोरोना रूग्ण नाही त्याभागाची शाळा सुरू ठेवावी-मा.आ.भीमराव धोंडे
By : Polticalface Team ,Sun Jan 16 2022 10:56:38 GMT+0530 (India Standard Time)
आष्टी(प्रतिनिधी)-महाराष्ट्रात कोरोनाचे रूग्ण वाढले म्हणून शासनाने महाराष्ट्रातील सर्वच शाळा बंद केल्या.पण ज्या भागात कोरोना रूग्ण नाहीत त्या भागातील शाळा सुरू ठेवाव्यात अशी मागणी मा.आ.भीमराव धोंडे यांनी केले.
आष्टी येथील भगवानबाबा महाविद्यालयात आज गुरूवार दि.13 रोजी सांयकाळी 7 वा.आयोजित करण्यात आलेल्या पञकार परिषदेत ते बोलत होते.यावेळी पुढे बोलतांना मा.आ.धोंडे म्हणाले,महाराष्ट्रात कोरोनाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत.त्यामुळे शासनाने महाराष्ट्रातील सर्वच शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.पण या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.आॅनलाईन क्लासेसमुळे पंचवीस टक्केच विद्यार्थी हा क्लास करतात बाकी विद्यार्थी हा क्लास करत नाही.त्यामुळे शासनाने ज्या भागात कोरोनाचे रूग्णच नाहीत त्या भागातील शाळा सुरू करण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगीतले.
(चौकट)
————
आष्टी नगर पंचायतच्या निवडणूकीत भारतीय जनता पार्टीने आम्हाला विश्वासात न घेता आमचे निवडणूकी आगोदर ठरल्याप्रमाणे जागा वाटप केले नाही.त्यामुळे आम्ही या नगर पंचायतच्या निवडणूकीतून सपशेल माघार घेतली आहे.पण या निवडणूकीत भाजपाच्या सर्व उमेदवारांना पाठिंबा असल्याचेही मा.आ.भीमराव धोंडे यांनी सांगीतले.
————————————————
वाचक क्रमांक :