By : Polticalface Team ,10-04-2025
पेडगाव, प्रतिनिधी पेडगाव येथे १४ एप्रिल २०२५ रोजी गुरु-शिष्य संयुक्त जयंती निमित्ताने एक विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, या कार्यक्रमात सत्यपाल महाराजांचे शिष्य इंजिनिअर पवन दवंडे यांचा हास्य प्रबोधन व खंजिरी कार्यक्रम सादर होणार आहे.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधन, हास्यविनोद आणि अध्यात्मिक संदेश यांचा सुरेख संगम उपस्थित श्रोत्यांना अनुभवता येणार आहे. पवन दवंडे हे त्यांची सडेतोड भाषाशैली, विनोदी ढंग आणि जीवनावश्यक मुद्द्यांवरील अभ्यासपूर्ण भाष्यामुळे प्रसिद्ध असून, त्यांनी आतापर्यंत अनेक ठिकाणी प्रभावी कार्यक्रम सादर केले आहेत.
भिमक्रांती तरुण मित्र मंडळ, पेडगाव यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, ग्रामस्थांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
वाचक क्रमांक :