भगवान महावीर स्वामी जन्म कल्याणक दिन श्रीगोंद्यात उत्साहात साजरा
By : Polticalface Team ,10-04-2025
भगवान महावीर स्वामी जन्म कल्याणक दिन श्रीगोंद्यात आनंदात साजरा
श्रीगोंदा प्रतिनिधी
दिनांक 10 एप्रिल 2025 रोजी भगवान महावीर स्वामी जन्मकल्याणक सकल जैन संघाद्वारे आनंदात व भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. श्रमण भगवान महावीर स्वामी यांचा जन्म इ.स. पूर्व 599 याच तिथीला कुंडलपूर नामक शहरात झाला. भगवान महावीरांनी त्यांच्या जीवनात व त्यांच्या आचरणातून जे काही सांगितले आहे त्याच पदचिन्हावर मार्गक्रमण करीत जैन समाज मार्गक्रमण करीत आहे. भगवान महावीरांचे चरित्र अहिंसा, सत्य,अपरिग्रह ब्रह्मचर्य व तप या सिद्धांतावर आधारित आहे.
श्रीगोंदा सकल जैन संघात भगवान महावीर स्वामी जन्मकल्याणक दिनानिमित्त खूपच आनंदाचे वातावरण पाहण्यास मिळाले.
यावर्षी प्रथमच श्रीगोंदा शहरात संपूर्ण तालुक्यातील छोट्या छोट्या गावातून जैन बांधव एकत्रित येत एकाच ठिकाणी भगवान महावीरांचा जन्म कल्याण दिन साजरा करण्याची ठरवण्यात आले. व त्यास सर्व तालुक्यातून भरभरून प्रतिसाद मिळाला व श्रीगोंदा तालुक्यातील सर्व गावातील जैन बांधव श्रीगोंद्यात जमा झाले. सकाळी ७ वा. जैन स्थानक श्रीगोंदा या ठिकाणाहून भगवान महावीर स्वामींच्या प्रतिमेची शोभायात्रा सुरू करण्यात आली. ही शोभायात्रा शिवाजी चौक, शनी चौक, जोधपुर मारुती चौकातुन जात बालाजी मंगल कार्यालयात संपन्न करण्यात आली. शोभायात्रेत सर्व जैन बांधवांनी सफेद वस्त्र परिधान केले होते व जैन भगिनींनी सौभाग्याचं प्रतीक असणारे लाल वस्त्र परिधान केले होते. त्यामुळे शोभायात्रेस खूपच सुंदर असे स्वरूप प्राप्त झाले होते. शोभा यात्रा मार्गक्रमण करीत असताना सर्व जैन बांधवांनी मार्गात कुठल्याही प्रकारचा कचरा अस्ताव्यस्त न टाकता त्या कचऱ्याची योग्य निर्मूलन करून खूपच सुंदर असा स्वच्छतेचा मूलमंत्र शहरवासीयांना दिला. या उपक्रमाची चर्चा संपूर्ण शहरात दिवसभर चालु होती.
शोभायात्रा बालाजी मंगल कार्यालयात पोहोचल्यानंतर महावीर स्वामीच्या जीवनावरती प्रकाश टाकण्याकरता सटाण्याहून सन्मा. श्री आनंदजी बंब यांना निमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी सर्व जैन बांधवांना महावीर स्वामींच्या जीवनातील अनेक प्रसंग सांगत मार्गदर्शन केले. याच काळात दुसरीकडे रक्तदान शिबिर घेण्यात आले तसेच शहरातील आनंद सद्भावना मंडळांनी शहरालगत असणाऱ्या जंगलामध्ये वास्तव्य करणाऱ्या वन्यजीवांसाठी अनेक पाणवट्यात पाण्याची व्यवस्था केली.
याप्रसंगी सर्व समाजातील प्रतिष्ठित तसेच मा.मंत्री आ. बबनदादा पाचपुते, सौ अनुराधाताई नागवडे, मा. आमदार राहुल दादा जगताप, टिळकजी भोस, स्मितल भैया वाबळे, शुभांगी ताई पोटे, एम डी शिंदे, अशोकराव खेंडके, बाप्पूतात्या गोरे, संतोष जी शिरसागर, गणेशजी भोस, सतीशजी बोरुडे, सर्व पत्रकार बंधू व अनेक सन्माननीय व्यक्तींनी उपस्थिती दर्शवली.
व्याख्यान झाल्यानंतर सर्व सन्माननीय व्यक्ती व जैन बांधवांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला. सदर महाप्रसादाची व्यवस्था करण्याचा लाभ लौकीक दिलीप मेहता व वैभव दिलीप मेथा यांनी घेतला होता.
कार्यक्रमाची प्रस्ताविक व सुत्रसंचलन विजय जी मुथा यांनी केले. यावेळी सकल जैन संघाचे अध्यक्ष विजयजी बोरा यांनी आपले मनोगत व्यक्त केले. उपस्थितांचे आभार नवनीत मुनोत यांनी मानले.
वाचक क्रमांक :
शफिक हावलदार
कार्यकारी संपाद्क
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.