By : Polticalface Team ,21-04-2025
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड. दौंड ता २१ एप्रिल २०२५ दौंड शहरातील श्री गणेश मोबाईल शाँपी बंद दुकानाचे शटरचे लाँक तोडून दुकानात प्रवेश करून अज्ञात चोरक्याने घरफोडी केल्या प्रकरणी दौंड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी-नितीन लक्ष्मण सलमपुरे. वय-३१ वर्षे, व्यवसाय मोबाईल शॉपी दुकान रा.नवगिरे वस्ती ता.दौंड जि पुणे असे आहे. १९/०४/२०२५ रोजी रात्रौ १० वा जे ते दि २०/०४/२०२५ रोजी सकाळी 8.11 वाचे दरम्यान मौजे दौंड ता.दौंड जि पुणे या ठिकाणी हि चोरीची घटना घडली असल्याचे दौंड पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांनी सांगितले. मौजे दौंड ता.दौंड जि पुणे गावचे हद्दीतून दि१९/०४/२०२५ रोजी रात्रौ १० ते दि २०/०४/२०२५ रोजी सकाळी 8:11 वाचे दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी सदर फिर्यादीच्या श्री गणेश मोबाईल शाँपी बंद दुकानाचे शटरचे लाँक तोडून अज्ञात चोरट्यांनी दुकानात प्रवेश करून घरफोडी चोरी केली असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
श्री गणेश मोबाईल शॉपी दुकानात झालेल्या चोरी बाबत फिर्यादीने अधिक चौकशी केली असता त्यांच्या दुकाना पासून थोड्या अंतरावर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील गोविंद नारायणदास ओझा यांचे मालकीचे ओझा गँस एजन्सी या दुकानाचे देखील शटरचे कडी कोयंडे तोडून चोरी करण्याचा प्रयत्न झाला असल्याचे सदर फिर्यादीला समजले असल्याने अज्ञात चोरट्यांन विरूध्द गु.रजि नं २९४/२०२५ भा.न्या.संहिता कलम ३३१(३), 331(३), ३०५ नुसार दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर प्रकरणी चोरीस गेलेल्या ५७ हजार शंभर रूपयाचे वर्णन फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आलेल्या किंमतीचा मुद्देमाल व रोख कँश खालील प्रमाणे असे
१) ९२५० रू किंमतीचा विवो T३ Lite 5G(Vibrant Green 128 GB) कंपनीचा मोबाईल फोनत्याचा IMEI NO-863675079255589.
२)९२५०/-रू किंमतीचा पो.को M7 (Ocean Blue 128 GB)कंपनीचा मोबाईल फोन त्याचा IMEI NO-861697071972666.
३) ३ हजार -रू किंमतीचा रेडमी नोट 8 Moonlight White 6Gb 128 Gb मोबाईल फोन त्याचा IMEI NO-864941045475381 त्यामध्ये एअरटेल कंपनीचे सिमकार्ड- 9096064868,जिओ कंपनीचे सिमकार्ड-9579973368 जु.वा.किं.अं.
४) १५००-रू किंमतीचा सँमसंग M 30 (IMEI NO नाही) सिमकार्ड नं -VI-8308025642 BSNL- 8275089580 जु.वा.किं.अं
5) ३४ हजार १००-रू भारतीय चलनातील ५०० रू दराचे ४० नोटा,१०० रू दराचे १०० नोटा ५० रू दराचे ५० नोटा,२० रूपये दराचे ३० नोटा,१० रू दराचे १०० नोटा असे एकूण ५७.हजार शंभर रुपये अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेले आहे .
या फिर्यादी वरून दौंड पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली दाखल अंमलदार-पो.हवा किरण राऊत. पुढील तपास -पो.हवा नितीन बोराडे करीत आहेत.