By : Polticalface Team ,26-04-2025
लिंपणगाव( प्रतिनिधी) श्रीगोंदा तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार कुरुमकर यांचे पत्रकारितेतील अस्र हे प्रशासन व समाज हितासाठी दिशादर्शक असल्याचे गौरवोद्गार एन एस गुळवे जुनियर कॉलेजचे प्रा राम सोनवणे यांनी काढले.
ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार कुरुमकर यांना नुकताच दैनिक राष्ट्र सह्याद्री समूहाने ग्रामीण भागातील जिल्हास्तरीय पुरस्कृत केल्याबद्दल काष्टी येथे यथोचित सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.
यावेळी बोलताना प्रा राम सोनवणे म्हणाले की; पत्रकार कुरुमकर यांनी आपल्या 27 वर्षाच्या पत्रकारितेत जिल्हा व तालुका प्रशासनाच्या समन्वयातून प्रलंबित विकास कामांसाठी अहोरात्र निर्भीडपणे लिखाण करून एक सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. आम्हालाही त्यांचे वेळोवेळी योग्य मार्गदर्शन लाभत असून; सतत समाजहित डोळ्यासमोर ठेवून आपल्या पत्रकारितेत उंची निर्माण केली आहे. तालुका पत्रकार संघातही त्यांचे सर्वच पत्रकारांना मौलिक असे मार्गदर्शन लाभत असल्याचे गौरवोद्गार प्रा. सोनवणे यांनी काढले.
यावेळी नवभारत माध्यमिक चे मुख्याध्यापक सुनील गिरमकर यावेळी म्हणाले की; पत्रकार कुरुमकर यांचे कार्य आपण जवळून पाहिले. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण कसा होईल यासाठी त्यांनी सर्वांशीच सलोख्याचे संबंध जोपासले. शैक्षणिक क्षेत्रातही त्यांचे कार्य प्रेरणादायी आहे. शैक्षणिक व पत्रकारिता क्षेत्रातील अनुभवी व्यक्ती म्हणून त्यांची ओळख आहे. निश्चितच दैनिक राष्ट्र सह्याद्री समूहाकडून पुरस्काराने त्यांच्या लेखणीमध्ये आणखी बळ मिळणार आहे. त्यांना मिळालेला पुरस्कार हे त्यांच्या कार्याचे फळ असल्याचे मुख्याध्यापक गिरमकर यांनी यावेळी सांगून त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा व्यक्त केल्या. तर यावेळी सामाजिक कार्यकर्ते शरद रोडे यांनीही कुरुमकर यांना पत्रकारितेतील पुढील कार्यास शुभेच्छा व्यक्त केल्या.
वाचक क्रमांक :