विरोधकांना चारी मुंड्या चीत करत आदेश नागवडे ठरले किंग मेकर
By : Polticalface Team ,Mon Jan 17 2022 09:21:23 GMT+0530 (India Standard Time)
प्रतिनिधी /श्रीगोंदा : नागवडे सहकारी साखर कारखान्याचा झालेल्या निवडुकीत राजेंद्र नागवडे यांनी दिपक नागवडे व आदेश नागवडे यांच्या वर जबाबदारी टाकली होती ,या निवडणुकीत अतिशय चांगले नियोजन करून विरोधकांच्या चारी मुंड्या चीत केल्याने आदेश नागवडे च खरे किंग मेकर असल्याचे सिद्ध झाले आहे .
नागवडे सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकीची गेली एक महिन्यापासून रणधुमाळी सुरू होती राजेंद्र नागवडे यांच्या जवळच्याच लोकांनी नागवडे यांना घेरले होते. नागवडे यांचा पराभव करण्यासाठी तालुक्यातील सर्व नेते एक झाले होते. त्यामुळे राजेंद्र नागवडे यांच्या निवडणुकीची सर्व जबाबदारी दीपक नागवडे व आदेश नागवडे
टाकण्यात आली होती. विश्वासाला तडा जाऊ नये म्हणून व कसल्या परिस्थितीत निवडणूक जिंकण्यायचीच असे ठरवून सभासदांचे चोख नियोजन केले. कुठेही कमतरता भासू दिली नाही एवढेच नव्हे तर सोसायटी मतदारसंघात नाहटा विरुद्ध आदेशशेठ अशी लढत पाहावयास मिळाली सुरवातीला नाहाटा यांनी १६ मतदार अज्ञात स्थळी ठेवल्याची चर्चा सुरू होती. याच दरम्यान आदेश यांच्या मदतीला दत्तात्रय पानसरे हे धावून आले आणि नाहाटांचे डावपेच उधळून लावले. आणि सेवा संस्था निवडणुकीत नाहाटा यांना १६ तर राजेंद्र नागवडे यांनी २५ मते मिळवून नागवडे विजयी झाले यामधे सर्वाधिक किंग मेकरची भूमिका वांगदरी गावचे सरपंच आदेश नागवडे यांनी बजावली आणि या निवडणुकीत सिद्धही केले. तसेच आदेश यांना मदतीला धनसिंग भोईटे, हेमंत नलगे, शिवाजी भोईटे, विजय मचे यांनी निवडणूक जिंकण्यासाठी मोठ्या प्रमाणात परिश्रम घेतले.
वाचक क्रमांक :