चर्मकार संघर्ष समितीच्या वतीने शाहीर भारत गाडेकर यांचा सपत्नीक सत्कार
By : Polticalface Team ,Mon Jan 17 2022 18:53:36 GMT+0530 (India Standard Time)
पाथर्डी प्रतिनिधी:
पाथर्डी शहरातील शाहिर भारत गाडेकर हे शैक्षणिक क्षेञात काम करुन त्या ठिकाणी नावलौकिंक मिळुन आपल्या शाहिरीच्या माध्यमातुन दीन दलितांचे प्रश्न मांडणारे भारत गाडेकर ख-या अर्थाने चर्मकार समाजाचे भूषण आहे, असे प्रतिपादन शिवाजीराव साळवे यांनी व्यक्त केले.
पाथर्डी शहरातील आनंद नगर येथील शाहीर भारत गाडेकर यांची शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या केंद्रीय कार्यकारणीत उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबददल चर्मकार संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य संस्थापक तथा अध्यक्ष शिवाजीराव साळवे यांच्या हस्ते त्यांचा नुकताच सपत्नीक सत्कार करण्यात आला, यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामकिसन सरोदे होते. सुभाषराव भागवत यांनीही आपले विचार मांडताना म्हटले, आपण समाजाचे देणे लागतो आणि सामाजिक बांधिलकी म्हणुन आपल्या माणसाला आपण मोठेपण देऊन सत्कार सन्मान केला पाहिजे. समाजात वावरतांना कोणी कोणालाही मोठे म्हणण्यास तयार नाही, म्हणून दुस-याला आपणच मोठे म्हणण्यास सुरवात केली पाहिजे.
यावेळी रामकिसन सरोदे, शंकर सोनवणे,संदिप शेवाळे, संदिप भागवत, देवेंद्र अंबेटकर, बाबासाहेब तेलोरे, मच्छिंद्र बाचकर यांनी शुभेच्छा दिल्या.
या वेळी शाहीर गाडेकर यांनी मनोगत व्यक्त करतांना म्हटले, चर्मकार संघर्ष समितीने माझा सपत्नीक सत्कार माझ्या घरी येऊन माझ्या कुटुंबां समावेत केला असुन हा सत्कार माझ्यासाठी खुप मोठा आहे. मला खुप-खुप आनंद झाला असुन मी भारावून गेलो आहे . मी आत्ता पर्यंत समाजाची सेवा केली आहे, यापुढे मी समाजासाठी चर्मकार संघर्ष समितीच्या माध्यमातून भावी काळात अडी-अडचणीच्या वेळी सर्वांच्या पाठीशी उभा राहिन. समाजाची सेवा करुन जी जबाबदारी देतील ती मी पार पाडीन. शेवटी शाहीर यांनी वामनदादा कर्डक यांचे गीत गाऊन समारोप केला.
या कार्यक्रमाच्या प्रसंगी रामकिसन सरोदे, रोहिदास एडके, शंकर सोनवणे, दताञय साळवे, बाबासाहेब काटकर, मच्छिंद्र बाचकर, बाबासाहेब तेलोरे, महादेव सपकाळ, सुभाषराव भागवत, सचिन नन्नावरे, संदिप शेवाळे,अभिषेक कांबळे, देवेंद्र अंबेटकर, संदिप भागवत,दिलीप बताडे, महादेव सरोदे, पियुश गाडेकर, भिमाबाई गाडेकर, सौ. गीता गाडेकर, कु.ईश्वरी गाडेकर आदींची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तथा आयोजन चर्मकार संघर्ष समितीचे युवक प्रदेश अध्यक्ष सुभाषराव भागवत यांनी केले. तसेच पाहुण्यांचे स्वागत संदिप शेवाळे यांनी केले.सुञ संचालन सचिन नन्नावरे यांनी केले तर आभार अभिषेक कांबळे यांनी मानले.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.