लिंपणगाव ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीचे लवकरच स्थलांतर !, २० लाख रुपये खर्च करून उभारते आहे नवीन वास्तू

By : Polticalface Team ,12-05-2025

लिंपणगाव ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीचे लवकरच स्थलांतर !, २० लाख रुपये खर्च करून उभारते आहे नवीन वास्तू लिंपणगाव (प्रतिनिधी)- श्रीगोंदा तालुक्यातील मोठ्या लोकसंख्येचे गाव समजल्या जाणाऱ्या लिंपणगाव ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीचे लवकरच स्थलांतर होत असून; उर्वरित इमारतीचे काम अंतिम टप्प्यात आल्याचे दिसते. दरम्यान लिंपणगाव हे तालुक्यात मोठ्या लोकसंखचे गाव असून; सहा वाड्या आणि गाव मिळून ग्रुप ग्रामपंचायत मार्फत लिंपणगावचा कारभार पाहिला जातो. गावची लोकसंख्या जवळपास 16 ते 17 हजाराच दरम्यान आहे. पूर्वी ग्रामपंचायतींना केंद्र व राज्य सरकारचा निधी अत्यंत तुटपुंजा मिळत असेल. तर त्या त्या ग्रामपंचायतीच्या गाव पातळीवरील घरपट्टी; पाणीपट्टी; दिवाबत्ती; आठवडे बाजार लिलाव त्यातूनच कर्मचाऱ्यांचे पगार व उर्वरित गावाचा विकास होत असे. परंतु अलीकडे गावच्या लोकसंख्येच्या धर्तीवर केंद्र व राज्य सरकारचा वित्त आयोगाचा निधी थेट ग्रामपंचायतच्या खात्यावर वर्ग केला जातो. * आता मात्र राज्य सरकारने ग्रामपंचायतींना विकास कामासंदर्भात मोठे अधिकार देताना विविध योजनांचे निधी देखील ग्रामपंचायत च्या खात्यांवर वर्ग केला जातो. त्यातून ग्रामपंचायतीच्या सदस्य मंडळाने गावचा कोणता विकास साधायचा या संदर्भात गाव विकास आराखडा तयार करून त्याचा ठराव घेतला जातो. तो गटविकास अधिकारी व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडे दाखल केला जातो. त्यांची मंजुरी आल्यानंतर गावच्या विकासाला एक मुहूर्त स्वरूप येते. अशा प्रकारे ग्रामपंचायतींना राज्य सरकारने पूर्णतः अधिकार दिल्याने प्रत्येक गाव विकासाच्या दृष्टीने गरुड झेप विकास कामे मार्गी लागले जातात. त्याच धर्तीवर तालुक्यातील ग्रामपंचायतींचा विकास साधला जात आहे. यासाठी गावचा कारभारी सक्षम असला पाहिजे; सर्वांना बरोबर घेऊन प्रत्येक प्रभागामध्ये निवडून आलेल्या सदस्यांना विश्वासात घेतले पाहिजे. त्यांच्या सूचनांचे देखील पालन केले पाहिजे. राजकारण विरहित सदस्यांमध्ये एकजूट असायला हवी. तरच गावचा सर्वांगीण विकास होऊ शकतो. अन्यथा गाव विकासापासून दूर राहू शकते. प्रामुख्याने मढेवडगाव या सुसंस्कृत व मोठ्या लोकसंख्येच्या गावामध्ये विविध विकास कामे सुरू आहेत. तेथे लोकनियुक्त सरपंच प्रमोद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सदस्य मंडळांचे देखील प्रत्येक विकास कामात उत्तम प्रकारे सहकार्य लाभते. म्हणूनच मढेवडगाव हे गाव विकासाच्या उंच शिखरावर जाताना दिसत आहे. एक तरुण तडफदार वारसा लाभलेले सरपंच मढेवडगावला लाभल्याने आज जिल्ह्यात आदर्श युक्त असे काम त्या गावात दिसून येत आहे. लिंपणगावमध्ये सध्यातरी सदस्य मंडळांमध्ये दुरावा दिसून येत नाही. लिंपणगाव ग्रामपंचायतमध्ये महिलाराज आहेत. सरपंच शोभाताई कोकाटे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायतचा योग्य दिशेने कारभार चालू असल्याचे दिसते. त्यांना जुने जाणकार माजी सरपंच अरविंद कुरुमकर यांच्यासारखी अनुभवी काही सदस्य मंडळ उत्तम प्रकारे सहकार्य करताना दिसत आहे. गावात ग्रामपंचायत अंतर्गत विविध विकास कामांचा सदस्य मंडळाकडून वेळोवेळी आढावा घेतला जात आहे. सध्या तरी एक जुटीने ग्रामपंचायतची विकास कामे मार्गे लागले जात आहेत. हे प्रत्यक्ष दर्शनी पाहणीनंतर दिसून येते. दरम्यान लिंपणगाव ग्रामपंचायत ही काही महिन्यांमध्येच नवीन वास्तूमध्ये स्थलांतर करणार आहे. पंधराव्या वित्त आयोगातून ही इमारत साधारणता वीस लाख रुपये खर्च करून मोठ्या दिमाखात दिसून येत आहे. कार्यालय अंतर्गत काही फर्निचर सुरू असल्याने या इमारतीत प्रवेश करण्यासाठी वेळ लागतोय. परंतु इमारत मात्र आकर्षक गावच्या नावाला शोभेल अशी दिसून येत आहे. काही जाणकारांच्या म्हणण्यानुसार गावची वेस आणि ग्रामपंचायतची इमारत सुसज्ज असणे महत्त्वाचे असते. ज्याप्रमाणे अंगणावरूनच घराचे वातावरण व कळा दिसून येते. त्याप्रमाणे या दोन्हीही बाबी उत्तम प्रकारे असेल तर निश्चितपणे गाव विविध योजना राबवत योग्य दिशेने वाटचाल करते. असे सर्वांनाच वाटते. त्यामुळे गावचा कारभारी उत्तम असायला हवा. घरातील कुटुंबाप्रमाणे ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात घेणारा असावा. त्याबरोबरच महत्त्वाचे म्हणजे ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारीही विकास कामे मार्गी लावण्यासाठी तत्पर असायला हवा. तरच गावचा सर्वांगीण विकास होऊ शकतो. असे देखील जुने जाणकार व्यक्तींचे म्हणणे आहे.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

इंदिरा गांधी पॉलिटेक्निकल डिप्लोमा साठी उत्कृष्ट पर्याय

कुरुमकर परिवारातील ज्येष्ठ माता कै.जिजाबाई कुरुमकर यांचे निधन

फण आशिया ऑनलाइन मटका जुगार चक्री जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांचा छापा.

निरावागजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नामपलकाची विटंबना : गाव बंद ठेवून निषेध सभा

10 रुपये टक्के व्याजाने घेतले होते 40 हजार रुपये. चार सावकारांन विरुद्ध दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

खंडेराव काकडे यांच्याकडून व्यंकनाथ विद्यालयाच्या दहावीच्या चार गुणवंत विद्यार्थिनींना प्रत्येकी 1100 रुपये बक्षीसाचे वितरण

नागवडे इंग्लिश मीडियम स्कूल ची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम.

छत्रपती शिवाजी.विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न!,माजी विद्यार्थ्यांनी जोपासला स्नेह मेळाव्याचा वारसा-मा.प्राचार्य तुकाराम कन्हेरकर*

शेतकऱ्यांचे हक्कासाठी प्रशासन सज्ज बंद व अतिक्रमित शिवार रस्त्यासाठी गावोदवंडीचे शासनाचा आदेश जारी

दौंड तालुक्यातील इयत्ता १० वी १२ वी मधिल शालेय विद्यार्थ्याचे अत्यावशक दाखले स्थानिक स्तरावर वाटप शिबीराचे आयोजन.

सहकार महर्षी बापूंच्या दूरदृष्टीमुळेच ग्रामीण विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास-संचालक डी आर काकडे , श्री व्यंकनाथ विद्यालयाच्या दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा संपन्न

स्मृतींचा सोहळा! छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात पार पडला

छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थांच्या विद्यालयांचे दहावी परीक्षांचे उत्कृष्ट निकाल

हंगेश्वर विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

वांगदरी गावात बिबट्याचे पुन्हा दर्शन शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण कायम, पत्रकार कुरुमकर यांनी वनविभागाला कल्पना देतात वन कर्मचारी घटनास्थळी दाखल

उध्दटला सोमवारपासून उदमाई देवीची तीन दिसव याञा उत्सव

लिंपणगाव ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीचे लवकरच स्थलांतर !, २० लाख रुपये खर्च करून उभारते आहे नवीन वास्तू

अखेर दोन दशकापासूनच्या प्रलंबित रस्त्यांचे मजबुतीकरण व डांबरीकरण प्रवाशी व वाहन चालकांमधून समाधान

वंचित बहुजन आघाडीची तिरंगा रैली संपन्न!

योग गुरू रामदेव बाबा यांचा अहिल्यानगर साधकांच्या वतीने सन्मान