By : Polticalface Team ,14-05-2025
लिंपणगाव (प्रतिनिधी)- श्रीगोंद्याचे भाग्यविधाते सहकार महर्षी दिवंगत शिवाजीराव नागवडे बापू यांनी तालुक्यात प्रत्येक खेडोपाडी गावात शिक्षणाची ज्ञानगंगा उभी केल्यामुळेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जात असल्याचे गौरवउद्गार नागवडे कारखान्याचे संचालक डी आर काकडे यांनी व्यक्त केले.
श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकनाथ येथील श्री व्यंकनाथ विद्यालयाचा इयत्ता दहावी मार्च 2025 चा 99% निकाल लागला. विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांनी उतुंग यश मिळवत उत्कृष्ट गुण मिळवले. त्या प्रित्यर्थ विद्यालय व स्कूल कमिटीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर नागवडे कारखान्याचे संचालक डी आर काकडे; मा.संचालक विलासराव काकडे; पुरुषोत्तम लगड; अकबरभाई इनामदार; उपसरपंच हनुमंत मगर; खंडेराव काकडे; सेवा संस्थेचे चेअरमन बाळासाहेब थोरात; मा प्राचार्य रंगनाथ राजापुरे; बाळासाहेब शेंडे; एम आर पवार; ग्रा. पंचायतचे सदस्य गणेश काकडे; राहुल गोरखे; दिगंबर साळवे प्राचार्य ए एल पुराणे; शिक्षक संतोष शिंदे; प्रा निसार शेख; मनोज कांबळे; पत्रकार नंदकुमार कुरुमकर; एकनाथ नेटवटे; राहुल येरकळ आदी सह गुणवंत विद्यार्थी व पालक यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी दहावीच्या बोर्ड परीक्षेत 90% च्या पुढे विशेष गुण प्राप्त केल्याबद्दल शिंदे सोनल; वडवकर सुप्रिया; डांगे स्नेहा; वागस्कर तेजस ऋतुजा कांडेकर या गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रत्येकी अकराशे रुपये बक्षीस वितरण करण्यात आले.
यावेळी गोरोदगार पर भाषणात माप प्राचार्य एम आर पवार म्हणाले की; विद्यालयाचा निकाल समाधानकारक लागला. या विद्यालयात अनुभवी शिक्षक व प्राचार्यांचे उत्तम प्रशासन असल्यामुळे निकालाचा दर्जा चांगला आहे. शिक्षकांनी मोठे परिश्रम घेऊन निकालाची परंपरा कायम राखली त्याबद्दल शुभेच्छा व्यक्त केल्या.
माप प्राचार्य रंगनाथ राजापुरे यावेळी बोलताना म्हणाले की; दहावी शिक्षणाचा खरे तर तोच पाया असतो. शिक्षणात आपण किती उंची ठरवावी; ते दहावीत कळते. नंतर पुढे उच्च शिक्षणाचा पाया बारावी मध्ये ठरतो. शिक्षकांनी प्रामाणिकपणे ज्ञानदान केले. पालकांनी विशेष लक्ष दिले. शिक्षणात सातत्या राखून ठेवले. त्यामुळेच विद्यार्थ्यांनी नेत्र दीपक गुण मिळवण्याचे सांगितले.
मा प्राचार्य बाळासाहेब शेंडे यावेळी म्हणाले की; विद्यार्थ्यांनी जिद्द; चिकाटी; आणि मेहनत अखेर पर्यंत ठेवली. तर यश दूर नाही. प्रथम आलेली विद्यार्थिनी सोनल शिंदे ही सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थिनी ती जिद्दी आहे. तिचे अधिकारी होण्याचे स्वप्न निश्चित पूर्ण होणार आहे. विद्यार्थ्यांनी पुढील शिक्षणात जगावेगळा उपक्रम मनाशी ठेवावा असे सांगून विद्यार्थ्यांना शुभेच्छा व्यक्त केल्या.
यावेळी मा. प्राचार्य एन टी शेलार सेवा संस्थेचे चेअरमन बाळासाहेब थोरात यांनी गुणवंताचे कौतुक करत पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
यावेळी प्राचार्य एल पुराने म्हणाले की; विद्यालयाच्या गुणवत्ता व इतर उपक्रमात स्कूल कमिटी; पालक; गावातील सामाजिक कार्यकर्ते यांचे बहुमोल सहकार्य लाभले. विद्यालयाने उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवत आली आहे. त्यामध्ये अपुरा शिक्षक वर्ग असतानाही जादा तासाच्या माध्यमातून अधिकाधिक ज्ञान घेण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. म्हणूनच विद्यार्थ्यांनी 90% च्या पुढे गुण मिळविले. यापुढेही या विद्यालयाच्या सर्वांगीण विकासासाठी विद्यालयाचा सर्व शिक्षक वर्ग कटिबद्ध राहील; अशी ग्वाही देत विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
सूत्रसंचालन प्रा. निसार शेख यांनी केले तर आभार शिक्षक संतोष शिंदे यांनी मानले.
वाचक क्रमांक :