By : Polticalface Team ,14-05-2025
लिंपणगाव (प्रतिनिधी)--श्रीगोंदा तालुक्यातील अनेक गावांमध्ये शेतकऱ्यांचे शिवार रस्ते, गाडी रस्ते, पाणंद आणि शेतीशी निगडित मार्ग हे गाव नकाशामध्ये असूनही प्रत्यक्षात बंद पडलेले, अतिक्रमित किंवा वापरात नसलेले आहेत. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी आणि शेतकऱ्यांचा हक्काचा रस्ता मोकळा करण्यासाठी महसूल विभागाने निर्णायक पावले उचलली आहेत.
महसूल मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक १४ मे २०२५ रोजी झालेल्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले असून, त्यानुसार तहसीलदार श्रीगोंदा यांनी सर्व ग्रामसेवक व ग्राम महसूल अधिकाऱ्यांना खालील सूचना दिल्या आहेत:
. गाव दवंडीद्वारे सूचना पुढील पमाणे;
गाव नकाशामध्ये नमूद असलेले पण सध्या बंद / अतिक्रमित असलेले शिवार रस्ते, गाडी रस्ते, पाणंद यासंबंधीची माहिती गावकऱ्यांना दवंडी देऊन कल्पना द्यावी यामध्ये संबंधित मार्गावरून अतिक्रमण करणाऱ्यांना लवकरात लवकर अतिक्रमण काढण्यास सांगावे, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट करावे;.
. रस्त्यांचे तातडीने सर्वेक्षण करून अहवाल सादर करावा
अशा बंद/अडथळाग्रस्त रस्त्यांची माहिती, स्थिती, व अडचणी असलेली ठिकाणे अहवालाद्वारे वरिष्ठ कार्यालयात सादर करावीत.
. भविष्यातील विकासकामांना अडथळा होणार नाही याची दक्षता घ्यावी;
शेतकऱ्यांच्या शेतीपर्यंत जाणारे रस्ते कायमस्वरूपी खुले राहतील याची खात्री प्रशासनाकडून घेण्यात येणार आहे.
आदेश काढून त्याची प्रत्यक्ष कृतीमध्ये अंमलबजावणी चालू केल्याबद्दल तालुका प्रशासनाचे चळवळीचे राज्य समन्वयक दादासाहेब जंगले पाटील व ॲड कडूस पाटील यांनी आभार व्यक्त केले आहेत
*श्रीगोंदा तहसील कार्यालयाने हा पुढाकार घेऊन, गावागावांत अडथळा निर्माण करणारे सर्व रस्ते मोकळे करण्याच्या दिशेने पाऊल उचलले आहे. हे पाऊल शेतकऱ्यांच्या न्यायासाठी एक मोठे समर्थन ठरणार आहे.राज्यातील इतर तालुक्यातील प्रशासनाने श्रीगोंदा तालुक्याप्रमाणे आदेश आदेश काढावेत - राज्य समन्वयक दादासाहेब जंगले पाटील
हा निर्णय हा केवळ प्रशासनिक आदेश नसून, तो शेतकऱ्यांच्या जगण्याच्या हक्काशी संबंधित आहे. गाव दवंडी हे लोकांपर्यंत थेट पोहोचण्यासाठी प्रभावी साधन असल्याने, त्याचा वापर करून जनजागृती करणे अनिवार्य आहे.
प्रभारी तहसीलदार प्रवीण मुदगुल
वाचक क्रमांक :