हंगेश्वर विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

By : Polticalface Team ,13-05-2025

हंगेश्वर विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न लिंपणगाव( प्रतिनिधी) श्रीगोंदा तालुक्यातील श्री हंगेश्वर विद्यालय, हंगेवाडी येथे 1998 च्या एस.एस.सी. बॅचचे स्नेहसंमेलन रविवार, दि. 11 मे 2025 रोजी मोठ्या उत्साहात पार पडले. तब्बल 27 वर्षांनंतर एकत्र आलेल्या विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत एकमेकांबरोबरचे बंध अधिक घट्ट केले. या स्नेहसंमेलनात शालेय जीवनातील गमती-जमती, शिक्षकांचे मार्गदर्शन, परीक्षा काळातील आठवणी आदींचा मनमोकळा आविष्कार झाला. 27 वर्षांनंतर पुन्हा भेट झाल्याने सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साहाचे वातावरण होते. विद्यार्थ्यांनी या कालावधीत शिक्षण, व्यवसाय, नोकरी, शेती आणि समाजकारण क्षेत्रात घेतलेल्या अनुभवांचे कथन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक कळसकर सर होते. त्यांनी आपल्या भाषणात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांच्या यशाचा गौरव केला. विशेष पाहुणे म्हणून सेवानिवृत्त अध्यापक चिखले सर आणि श्रीगोंदा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक भाऊसाहेब कोळपे यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. या स्नेहसंमेलनाला 40 हून अधिक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन 1998 च्या बॅचमधील उत्साही विद्यार्थ्यांनी केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ. हनुमंत शिंदे आणि आभार प्रदर्शन राम रायकर सर या माजी विद्यार्थ्यांनी केले. स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने शाळेतील सुसंस्कारित सोहळा सर्वांच्या मनात कोरला गेला.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

इंदिरा गांधी पॉलिटेक्निकल डिप्लोमा साठी उत्कृष्ट पर्याय

कुरुमकर परिवारातील ज्येष्ठ माता कै.जिजाबाई कुरुमकर यांचे निधन

फण आशिया ऑनलाइन मटका जुगार चक्री जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांचा छापा.

निरावागजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नामपलकाची विटंबना : गाव बंद ठेवून निषेध सभा

10 रुपये टक्के व्याजाने घेतले होते 40 हजार रुपये. चार सावकारांन विरुद्ध दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

खंडेराव काकडे यांच्याकडून व्यंकनाथ विद्यालयाच्या दहावीच्या चार गुणवंत विद्यार्थिनींना प्रत्येकी 1100 रुपये बक्षीसाचे वितरण

नागवडे इंग्लिश मीडियम स्कूल ची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम.

छत्रपती शिवाजी.विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न!,माजी विद्यार्थ्यांनी जोपासला स्नेह मेळाव्याचा वारसा-मा.प्राचार्य तुकाराम कन्हेरकर*

शेतकऱ्यांचे हक्कासाठी प्रशासन सज्ज बंद व अतिक्रमित शिवार रस्त्यासाठी गावोदवंडीचे शासनाचा आदेश जारी

दौंड तालुक्यातील इयत्ता १० वी १२ वी मधिल शालेय विद्यार्थ्याचे अत्यावशक दाखले स्थानिक स्तरावर वाटप शिबीराचे आयोजन.

सहकार महर्षी बापूंच्या दूरदृष्टीमुळेच ग्रामीण विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास-संचालक डी आर काकडे , श्री व्यंकनाथ विद्यालयाच्या दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा संपन्न

स्मृतींचा सोहळा! छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात पार पडला

छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थांच्या विद्यालयांचे दहावी परीक्षांचे उत्कृष्ट निकाल

हंगेश्वर विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

वांगदरी गावात बिबट्याचे पुन्हा दर्शन शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण कायम, पत्रकार कुरुमकर यांनी वनविभागाला कल्पना देतात वन कर्मचारी घटनास्थळी दाखल

उध्दटला सोमवारपासून उदमाई देवीची तीन दिसव याञा उत्सव

लिंपणगाव ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीचे लवकरच स्थलांतर !, २० लाख रुपये खर्च करून उभारते आहे नवीन वास्तू

अखेर दोन दशकापासूनच्या प्रलंबित रस्त्यांचे मजबुतीकरण व डांबरीकरण प्रवाशी व वाहन चालकांमधून समाधान

वंचित बहुजन आघाडीची तिरंगा रैली संपन्न!

योग गुरू रामदेव बाबा यांचा अहिल्यानगर साधकांच्या वतीने सन्मान