कुकडी कारखान्याच्या अध्यक्ष पदी राहुल जगताप तर उपाध्यक्ष पदी विवेक पवार यांची बिनविरोध निवड
By : Polticalface Team ,Wed Jan 19 2022 09:02:52 GMT+0530 (India Standard Time)
श्रीगोंदा प्रतिनिधी: तालुक्यातील अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या कर्मयोगी कुंडलीकराव जगताप कुकडी सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्ष पदी राहुल जगताप यांची तर उपाध्यक्ष पदी येळपणे गावचे सुपुत्र विवेक पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली .
निवडणूक प्रक्रिया कुकडी सहकारी साखर कारखान्याच्या प्रनांगणात पार पडली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी यांनी संचालकांना अर्ज करण्यासाठी सूचना केल्या त्यावेळी चेअरमन पदासाठी माजी आमदार राहुलदादा जगताप यांचा व व्हाईस चेअरमन पदासाठी विवेक पवार यांचा एकमेव अर्ज आला त्यामुळे निवडणूक निर्णायक अधिकारी यांनी निवडणूक बिनविरोध झाली असे जाहीर केले. यावेळी उपस्थित सर्व सभासदांनी एकच जल्लोष केला.या निवडणुकी साठी निवडणूक निर्णयक अधिकारी श्री.दिग्विजय आहेर यांनी काम पाहिले तर त्यांना सहाय्यक उपनिबंधक थोरात साहेब यांनी साह्य केले.
या निवडीप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार आपल्या भाषणात म्हणाले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शब्द दिला होता पिंपळगाव पिंसा येथील कुकडी सहकारी साखर कारखान्याची संचालक मंडळाची निवडणुक बिनविरोध होईल, तो शब्द आज खरा ठरला ,कुकडी कारखान्याचे अध्यक्ष ,उपाध्यक्ष व नवनिर्वाचित संचालक मंडळाने जबाबदारीने कामकाज केले पाहिजे , सभासद वर्गाने जो विश्वास तुम्हावर टाकला आहे तो विश्वास द्विगुणित करण्याचा प्रयत्न करा,बिनविरोध निवडणुकीत जे ईच्छुक उमेदवार थांबलेत त्यांचाही योग्य वेळी योग्य ठिकाणी विचार झाला पाहिजे असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम आण्णा शेलार यांनी केले निवडीनंतर विद्यमान नवनिर्वाचित चेअरमन राहुलदादा जगताप म्हणाले आदरणीय स्वर्गीय तात्यांच्या नंतरची ही पहिलीच निवडणूक असल्याने कारखान्याच्या सर्व सभासदांनी व कुकडी कारखान्यावर प्रेम करणाऱ्या सर्व मंडळींनी चेअरमनपदाची धुरा देऊन विश्वास दाखवला आहे त्या विश्वासाचे सोने करून दाखवण्याचा प्रयत्न करेल.तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, तसेच तालुक्यातील घनश्याम आण्णा शेलार,आमदार बबन दादा पाचपुते, राजेंद्र नागवडे,दिनूकाका पंधरकर, ईश्वरे गुरुजी,अँड.बाळासाहेब पवार इत्यादींचे निवडणूक बिनविरोध करण्यास मदत केली या सर्व सभासद व नेते कार्यकर्ते या सर्वांचे आभार मानले. तसेच यावेळी नवनिर्वाचित व्हाईस चेअरमन विवेक आबा पवार यांनी त्यांच्यावर दाखवलेला विश्वास व एवढी मोठी जबाबदारी दिल्यामुळे मनापासून ऋण व्यक्त केले व दिलेल्या संधीचं नक्कीच सोने करील असे म्हणले हे बोलत असताना त्यांचे मन गहिवरून आले व त्यांनी उपस्थिती सर्व सभासदांचे आभार मानले.
गुरुदेव महिला पंतस्थेच्या माजी चेअरमन अनुराधा जगताप,गुरुदेव महिला पंतस्थेच्या विद्यमान चेअरमन प्रणोतीमाई जगताप, श्रीगोंदा तालुक्यातील विविध गावचे सरपंच ,उपसंरपच ,पदाधिकारी , कारखान्याचे आजी,माजी संचालक मंडळ, सभासद वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते .
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.