बेताल वक्तव्याची दखल घेऊन नानासाहेब पटोले यांच्यावर गुन्हा दाखल करावा -डॉ. प्रतिभाताई पाचपुते
By : Polticalface Team ,Wed Jan 19 2022 16:44:28 GMT+0530 (India Standard Time)
श्रीगोंदा प्रतिनिधी :- मी मोदींना शिव्या देऊ शकतो. मारु शकतो, असे आक्षेपार्ह वक्तव्य कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोमवारी (ता. १७ जानेवारी) भंडारा येथे केले होते. त्याचे तीव्र पडसाद लगेचच श्रीगोंद्यामध्ये बुधवारी (ता. १९ जानेवारी) उमटले. भाजपा व आमदार पाचपुते यांच्या सौभाग्यवती डॉ.सौ. प्रतिभाताई पाचपुते यांनी पटोले यांच्या प्रतिमेला जोडे मारून आपला निषेध आणि संताप व्यक्त केला. या वेळी पटोलेंच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. शहराच्या नागरिकांनी या जोडे मारो आंदोलनात आपला सहभाग नोंदविला.
भंडारा येथील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक प्रचारादरम्यान पटोले यांनी मोदी यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले होते. ‘‘आपण मोदीला मारुही शकतो व शिव्याही देवू शकतो…’’ असे वादग्रस्त विधान केल्यामुळे पटोले यांच्याविरोधात संपूर्ण राज्यात भाजपकडून संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, आपण मोदी नावाच्या स्थानिक गुंडाबाबत असे वक्तव्य केल्याचा ‘यू टर्न’ पटोलेंनी वाद निर्माण होताच घेतला आहे.
श्रीगोंदा भाजप कडून तहसिल कार्यालयाबाहेर झालेल्या या आंदोलनात लोकभावना विचारात घेऊन आपण त्वरित नाना पटोले यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी निवेदनाद्वारे तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांच्याकडे करण्यात आली. यावेळी डॉ.सौ.प्रतिभाताई पाचपुते, भाजपा श्रीगोंदा तालुकाध्यक्ष संदीप नागवडे, बापुतात्या गोरे, दत्ताभाऊ हिरणावळे, अशोक खेंडके, काका कदम, दिपक शिंदे, भगवान वाळके, दिलीप रासकर, राजेंद्र उकांडे, नितीन नलगे, सौ.सुहासिनी गांधी, शहाजी खेतमाळीस, सुनील वाळके, संग्राम घोडके, अंबादास औटी, संतोष क्षिरसागर, सुधीर खेडकर, महावीर पटवा, रमेश लाढाणे, संजय खेतमाळीस, महेश क्षीरसागर, सौ.संध्या रसाळ, उमेश बोरुडे, भुजंगराव काकडे, आदेश शेंडगे, ऋषिकेश गोरे, विशाल कवडे, आदित्य अनवणे आदींनी भाग घेतला. मुर्दाबाद…मुर्दाबाद.. नाना पटोले मुर्दाबाद…, नाना पटोलेचे करायचं काय, खाली डोकं, वर पाय अशा घोषणा यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी दिल्या.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
यवत येथील मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांच्या रांगा. ईव्हीएम मशिन मात्र संत गतीने. उशीरा पर्यंत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क.
शरद पवारांच्या सभेला आणलेल्या खुर्च्या. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत वापरल्या. तालुक्यात होतेय चर्चा
श्रीगोंदयाच्या आमदारकीवर नागवडेंचाच सर्वाधिक नैतिक अधिकार.
श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात सुरू. यवत नगरीत भक्तीमय वातावरण.
श्रीगोंद्यात वंचित च्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी, 3 साखर सम्राट विरोधात सामान्य शेतकऱ्यांचे मोठे आवाहन, सभेचा विरोधकांनी घेतला धसका
श्रीगोंद्यात धनगर समाज नागवडे सोबत- कोल्हटकर
वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ आज 1वा.ॲड प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा.गर्दीचा नवीन विक्रम होणार
विक्रम पाचपुते यांनी लोकांची फसवणूक करत गुन्हेगारीत विक्रम करत विकास कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी प्रमाणात वसुली केली तर नागवडे यांच्या 15 खोक्यांनी माझ्या तिकीटाचा सौदा केला - राहुल जगताप
महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांना बहुमताने विजय करा निधी कमी पडून देणार नाही उद्धव ठाकरे
सौ अनुराधाताईंना नागवडेंना प्रचंड मताने निवडून द्या विकासाची हमी आम्ही घेतो- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत दौंड नगर परिषदेतर्फे सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन: मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे.
महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या उद्याच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता
श्रीगोंद्यात मतदान अधिकारी मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न
अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात
दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील
महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.
दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.
सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन
अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद