आरती केदार व अंबिका वाटाडे यांना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचा सर्वोत्कृष्ट पुरस्कार
By : Polticalface Team ,Wed Jan 19 2022 20:42:00 GMT+0530 (India Standard Time)
पाथर्डी प्रतिनिधी:
एस. व्ही. नेट च्या महीला खेळाडुंना महाराष्ट्र राज्य क्रिकेट असोसिएशन (एम सी ए) तर्फे २०२०-२०२१ मध्ये दिला जाणारा सर्वोत्कृष्ट गोलंदाज हा पुरस्कार आरती केदार व सर्वोत्कृष्ट फलंदाज हा पुरस्कार अंबिका वाटाडे हीस देण्यात आला आहे.
ॲड. प्रताप ढाकणे यांच्या अनमोल सहकार्याने व प्रशिक्षक शशिकांत निऱ्हाळी यांच्या मार्गदर्शनाखाली एस.व्ही.नेट अकॅडमी पाथर्डी मध्ये ह्या सराव करतात. गेल्या ४ वर्षांपासून ह्या खेळाडू महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. तसेच उत्कृष्ट कामगिरी करत आहेत .अंबिका वाटाडे ही १९ वर्ष वयोगट भारतीय-अ संघाकडून चॅलेंजर ट्रॉफी याच वर्षी खेळली आहे, व आरती केदार महाराष्ट्र राज्य सिनियर रणजी संघात खेळली आहे.यांची ४ वर्षाची मेहनत व कामगिरी पाहता आरती व अंबिका यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. यांच्या सोबतच भारतीय संघात खेळणारा खेळाडू केदार जाधव, आयपीएल मध्य केकेआर संघात खेळणारा खेळाडू राहुल त्रिपाठी व भारतीय महिला संघात खेळणाऱ्या अनुजा पाटील, देविका वैद्य, तेजल हसबनिस यांना देखील पुरस्कार मिळाला आहे.
कु.आरती केदार व कु.अंबिका वाटाडे यांस हा पुरस्कार महाराष्ट्र राज्य क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियम (गहूंजे,पुणे) येथे १७ जानेवारी रोजी देण्यात आला आहे. हा पूरस्कार घेणाऱ्या त्या अहमदनगर जिल्ह्याच्या पहिल्या खेळाडु ठरल्या आहेत. संपूर्ण महाराष्ट्रातुन त्यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे. पाथर्डी तालुका टी-२० असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. प्रताप ढाकणे व जि.प.सदस्या प्रभावती ढाकणे यांनी या खेळाडूंना शुभेच्छा देऊन अभिनंदन केले आहे.
वाचक क्रमांक :