घरगुती वादाचा राग मनात धरून. भाच्यानेच मामाच्या डोक्यात दगड घालुन केला खुन. यवत येथील धक्कादायक घटना.
By : Polticalface Team ,24-05-2025
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
दौंड ता २४ मे २०२५ दौंड तालुक्यातील मौजे यवत ता दौंड जिल्हा पुणे येथील गावच्या मुख्य चौकातील बिकानेर स्वीट होम समोर बाकड्यावर (मामा) नितिन खैरे बसलेले असतात या ठिकाणी अचानक (भाचा) आरोपी प्रसाद सुनिल नलावडे- वय 24 रा यवत ता दौड जि पुणे याने घरगुती वादाचा राग मनात धरून डोक्यात दगडाने मारहाण केल्याने नितिन खैरे यांना गंभीर जखमी झाल्याने त्यांना वाय.सी-एम हॉस्पीटल, पिंपरी चिंचवड येथे उपचारकामी अँडमिट केले असता आज दिनांक 22/05/2025 रोजी उपचारा दरम्यान नितीन खैरे मयत झाल्याने सदर गुन्हयास वाढीव खुनाचे भारतीय न्याय संहितेचे कलम 103 वाढविले आहे हि घटना दि.04/05/2025 रोजी 22.15 वाजे सुमारास मौजे यवत गावातील मुख्य चौकात असलेल्या.बिकानेर स्वीट होम ता दौड जि पुणे या ठिकाणी घडली असल्याची माहिती यवत पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी दिली
यवत पोलीस स्टेशन येथे फिर्यादी निर्मला नितीन खैरे वय 45 वर्ष व्यवसाय गृहिणी रा यवत ता दौड जि पुणे. यांच्या तक्रारी वरून आरोपी प्रसाद सुनिल नलावडे. वय 24 वर्ष रा यवत ता दौड जि-पुणे याचे विरुद्ध यवत पोलीस स्टेशन गुन्हा र.नं 413/ 2025 भारतीय न्याय संहिता कलम 103, 109 अंन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी प्रसाद सुनिल नलावडे यास दिनांक 05/05/2025 रोजी 04.51 वाजे सुमारास यवत पोलीस प्रशासनाने अटक केली आहे
थोडक्यात हकिगत - वर नमुद केले तारखेस वेळी व ठिकाणी यवत गावच्या हद्दीत डी बी मेडीकल मध्ये फिर्यादी निर्मला नितीन खैरे तसेच कामगार विजय महावीर असे असताना यांना अविनाश निगडे यांनी सांगितले की. बिकानेर स्वीट होम समोर तुमचा भाचा प्रसाद नलावडे याने तुमचे पती नितीन खैरे यांचे डोक्यामध्ये दगडाने मारहाण केली व मारहाणीत त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. व डावे हाताची करंगळी तुटलेली आहे. असे फिर्यादीत नमूद करण्यात आले असून वगैरे मजकुरचे फिर्यादी वरून यवत पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा रजिस्टरी दाखल करण्यात आला असल्याची नोंद तत्पूर्वी करण्यात आली होती.
वाचक क्रमांक :