नगरसेवक प्रवीण राजगुरू यांचे महादेवाला अभिषेक करून साकडे

By : Polticalface Team ,Thu Jan 20 2022 08:44:15 GMT+0530 (India Standard Time)

नगरसेवक प्रवीण राजगुरू यांचे महादेवाला अभिषेक करून साकडे पाथर्डी प्रतिनिधी: पाथर्डी- शेवगाव मतदार संघाच्या लोकप्रिय आमदार मोनिकाताई राजीवजी राजळे यांना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभावे, यासाठी नगरसेवक प्रविण राजगुरू व त्यांच्या मित्र मंडळाने पाथर्डी शहरातील पुरातन कालीन ग्रामदैवत तपनेश्वर मंदिरांमध्ये महादेवाला अभिषेक करून साकडे घातले आहे. मागील दोन वर्षांमध्ये कोरोना हा गंभीर प्रकारचा आजार आल्यानंतर ताईंनी अनेक रुग्णांना नगर- पुणे-औरंगाबाद- मुंबई-नाशिक आदी कोविड सेंटरच्या माध्यमातून मतदार संघातील व राज्यातील रुग्णांच्या मदतीसाठी मोठे प्रयत्न केले होते. मात्र यादरम्यान मोनिका ताईंना दोन वेळा कोरोनाची लागण झाली असता जनतेच्या आशीर्वादाने ताईंनी कोरोनाचा मात करत जीवाची पर्वा न करता पाथर्डी- शेवगाव मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिकांसाठी आपल्या जीवाची बाजी लावत रुग्णालयामध्ये जाऊन त्यांना मदत करण्याचे कार्य अविरतपणे चालू ठेवले. यामुळे मतदार संघातील हजारो रुग्णांना याचा लाभ झाला. तसेच अवकाळी पाऊस गारपीट पूर परिस्थिती आदी आस्मानी संकट आल्यानंतर देखील आपत्तीग्रस्तांसाठी धाव घेऊन शेतकरी वर्गासह सर्वसामान्यांना आधार देण्याचे काम केले. शासकीय मदत मिळण्यास उशीर झाल्यानंतर त्यांनी अहमदनगर येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत, विधानसभेत सुध्दा आवाज उठवला. विशेष म्हणजे आपला आजार व समस्या बाजूला ठेवून अगदी हसत मुखाने प्रत्येक समस्येला तोंड देत त्यांनी नेहमीच आपल्या सर्वसामान्य जनता व कार्यकर्त्यांच्या सुख:दुःखाच्या कार्यात जाऊन आधार देण्याचे कार्य केले आहे. यामुळे अशा सर्वमान्य लोकनेत्याची गरज आपल्या मतदारसंघाला जिल्ह्याला व राज्याला आहे. मोनिकाताई सारख्या जनसेवेचा वारसा असणाऱ्या व मतदार संघातील वैयक्तिक अथवा सार्वजनिक कामासाठी पायाला भिंगरी लावून फिरणाऱ्या माऊलीच्या सध्या पायाला छोट्याशा अपघातातून झालेली इजा लवकर बरी व्हावी, यासाठी नगरसेवक प्रविण राजगुरू व त्यांच्या मित्र मंडळाने पाथर्डी शहराचे ग्रामदैवत श्री.तपनेश्वर येथील महादेवाच्या मंदिरात अभिषेक व पूजा करून साकडे घातले. तसेच नगरसेवक प्रविण राजगुरू व त्यांचे मित्रमंडळ व कार्यकर्ते पाथर्डी तालुक्यातील सर्व जातीय धर्मातील जागृत देवस्थान येथे आमदार मोनिकाताई राजळे यांच्या निरोगी व उत्तम आरोग्यासाठी साकडे घालणार असल्याची माहिती त्यांच्या मित्र मंडळाने दिली आहे.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.