अतिष निऱ्हाळी यांचे गटारीच्या नूतनीकरणासाठी मुख्याधिकार्यांना निवेदन
By : Polticalface Team ,Thu Jan 20 2022 08:45:42 GMT+0530 (India Standard Time)
पाथर्डी प्रतिनिधी:
पाथर्डी शहरातील अष्टवाडा येथील कोष्टी घर ते भालसिंग घर यादरम्यान च्या गटरीचे जलदगतीने नूतनीकरण करावे, अशी मागणी अष्टवाडा मंडळाचे अध्यक्ष आतिष नि-हाळी यांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांचेकडे केली आहे.
पाथर्डी शहरातील अष्टवाडा परिसरातील भालसिंग प्रेस ते कोष्टी घर दरम्यान जुनी गटार असून ती गेल्या ३ महिन्यापासून तुंबली आहे व रस्त्यावर पाणी येऊन डबके साचत आहे. स्थानिक नगरसेवकांना व पालिका प्रशासनाला कळविलेले असून अद्याप गटारीच्या कामाबद्दल कोणतीही दखल घेतली गेली नाही, म्हणून आतिष नि-हाळी यांनी मुख्याधिकारी यांना निवेदन दिले आहे.
सध्याच्या दूषित वातावरणामुळे आधीच रोगराई पसरत आहे आणि त्यात गटार तुंबल्याने परिसरात डासांचे प्रमाण व दुर्गंधी वाढली आहे.
अष्टवाडा मधील त्या गटारीवरील रोड हा मुख्य रोड असून ह्या रोड ने सिनेमागल्ली, ढवारगल्ली, कासारगल्ली व कसब्यापर्यंतच्या नागरिकांची या रस्ताने वर्दळ असते तसेच शाळेत जाणारे लहान मुले देखील ह्याच रास्ताने ये- जा करतात.
नागरिकांच्या आरोग्याची काळजी प्रशासनाने घ्यावी व जलदगतीने गटारीचे नुतनीकरण करावे, अशी विनंती आतिष नि-हाळी यांनी केली आहे.
यावेळी निवेदन देतांना आतिष नि-हाळी, मुकूंद भालसिंग, निशिकांत कोष्टी, ओम भालसिंग, अक्षय वराडे,आकाश भातोडे, गणेश गर्जे, प्रतीक वराडे,विशाल नि-हाळी, सिद्धाराज खोजे, अमर पारखे, प्रतीक पारेकर, ओम बडदे, विष्णनाथ शिरसाठ, योगेश बळे आदींची उपस्थिती होती.
*चौकट*
या गटारीवरील रस्ता मुख्य रस्ता असून नागरिकांना या रस्त्याने ये-जा करण्यासाठी कसरत करावी लागत आहे. ३ वर्षांपूर्वी कोष्टी घर ते वराडे घरापर्यंत ची गटार मंजूर झाली असून या गटरीचे अर्धेच काम झाले होते. अर्धे काम अजूनही राहिलेले आहे. स्थानिक नागरिकांनी अर्धी गटार कोठे गेली? याचा शोध घेण्याची गरज आहे. परिसरात खूप दुर्गंधी पसरत आहे. प्रशासनाने नागरिकांना वेठीस धरू नये व या कामाची लवकर दखल घ्यावी- *आतिष नि-हाळी*
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.