वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

By : Polticalface Team ,30-05-2025

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा! वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा! श्रीगोंदा प्रतिनिधी , दि. ३० मे २०२५ : कालचा वर्ग, आजचा परिवार! अशी भावना मनात साठवत, वांगदरी विद्यालयाच्या इयत्ता दहावी २००१ च्या बॅचचा स्नेहमेळावा तब्बल पंचवीस वर्षांनंतर उत्साहात आणि भावनांनी भारलेल्या वातावरणात पार पडला. दिनांक २५ मे रोजी यवत जवळील निसर्गरम्य ‘मेहेर रिट्रीट ऍग्रो टुरिझम’ या ठिकाणी जुन्या मित्र-मैत्रिणींचा पुन्हा एकत्र येण्याचा सोहळा रंगला. जवळपास ३६ माजी विद्यार्थी, ज्यात २१ मुले व १५ मुली सहभागी झाल्या होत्या, त्यांनी आपली व्यस्त जीवनरेषा थांबवून या खास क्षणासाठी उपस्थिती लावली. अवकाळी पावसाच्या सरी पडत असतानाही जुन्या मित्रांना भेटण्याच्या ओढीपोटी कोणाच्याच पायांना लगाम लागला नाही. या स्नेहमेळाव्याचे संयोजन गणेश नागवडे, अविनाश जगताप, संतोष सोनवणे, गीतांजली पवार आणि कविता गायकवाड या माजी विद्यार्थ्यांनी हिरीरीने केले. त्यांनी आठवणींच्या या गोफात प्रेमाचे धागे मिसळत मनमिळावूपणाचा झंकार घडवून आणला. कार्यक्रमाच्या सुरुवातीस सर्व उपस्थितांनी आपापला पंचवीस वर्षांचा जीवनप्रवास थोडक्यात कथन करत अनुभवांची शिदोरी उलगडली. शालेय आठवणी, बालमित्रांच्या गमतीजमती, शिक्षकांचे मार्गदर्शन यांचे सूर जणू पुन्हा एकदा हृदयात गुंजले. गप्पागोष्टी, फोटोसेशन्स आणि हास्यविनोदांनी दिवस कसा गेला ते कळलेही नाही! या स्नेहमेळाव्यास नितीन पवार, शिवाजी चोरमले, वैशाली नागवडे, रेखा नागवडे, वृषाली नागवडे, जयश्री लगड, अनिल जानकर, काका घाडगे, सचिन जाधव, कीर्ती राऊत, अश्विनी सोनवणे, बापू महानोर, भूषण गायकवाड, छाया बडे, धनंजय कोरडकर, जालिंदर काळे, बाळू महानोर, किरण जाधव, मोहन भिसे, पल्लवी दरेकर, पाराजी सरक, रफिक सय्यद, राहुल इथापे, सदा महानोर, संतोष जाधव, सीमा गोरे, सुनीता सुत्तेकर, रूपाली खंडागळे यांसह अनेक माजी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. अशा या स्नेहमेळाव्याने सर्वांच्या मनात नात्यांची उब पुन्हा जागवली, आणि जुने दिवस नव्याने अनुभवण्याचा एक अविस्मरणीय क्षण देऊन गेला अशी भावना प्रत्येक माजी विद्यार्थ्यांनी यावेळी व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण जाधव यांनी केले तर कार्यक्रमाची सांगताकरताना, गणेश नागवडे यांनी सर्व उपस्थितांचे मनःपूर्वक आभार मानले आणि पुढील स्नेहमेळाव्यासाठी अधिक उत्साहाने एकत्र येण्याचे आवाहन केले.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


शफिक हावलदार
कार्यकारी संपाद्क

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.