घरकुल योजनेमध्ये लाभार्थ्यांची आर्थिक लूट होत असल्याचा जिल्हा परिषद सदस्या पंचशिला गिरमकर यांचा आरोप, आमदार बबनराव पाचपुते यांचीही पुष्टी

By : Polticalface Team ,Thu Jan 20 2022 09:51:08 GMT+0530 (India Standard Time)

घरकुल योजनेमध्ये लाभार्थ्यांची आर्थिक लूट होत असल्याचा जिल्हा परिषद सदस्या पंचशिला गिरमकर यांचा आरोप, आमदार बबनराव पाचपुते यांचीही पुष्टी आढळगावः घरकुल योजनेला ग्रामपंचायतीसह पंचायत समितीतील अधिकारी अडसर बनले असून लाभार्थ्यांची आर्थिक लूट होत असल्याच्या जिल्हा परिषद सदस्या पंचशिला गिरमकर यांच्या थेट आरोपाला आमदार बबनराव पाचपुते यांनीही पुष्टी दिली. ऑनलाईन कार्यशाळेतील या आरोपांमुळे श्रीगोंदा पंचायत समितीच्या गटविकास अधिका-यांना स्वतः आयोजित कार्यशाळा गुंडाळण्याची वेळ आली. केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध घरकुल योजनांची गतीमानता आणि गुणवत्ता वाढीसाठी महाआवास अभियान राबविण्यात येत आहे. यासाठी मंगळवारी (दि. १८) ऑनलाईन कार्यशाळा गटविकास अधिकारी गोरख शेलार यांनी आयोजित केली होती. आमदार बबनराव पाचपुते, तहसीलदार मिलिंद कुलथे, सभापती गितांजली पाडळे, जिल्हा परिषद सदस्या पंचशिला गिरमकर,कोमल वाखारे, तालुक्यातील विविध गावांचे सरपंच, ग्रामसेवक तसेच अन्य पदाधिकारी या कार्यशाळेसाठी ऑनलाईन उपस्थित होते. सुरुवातीला या योजनेचा आढावा घेण्यात आला. घरकुल योजनेचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी पदाधिकारी आणि अधिकारी यांनी एकत्र येऊन काम केले तर सर्वांसाठी घरे हे स्वप्न पूर्ण होणार असल्याचे गटविकास अधिकारी शेलार यांनी सांगितले. परंतु, घरकुल योजनेतील लाभार्थ्यांची ग्रामपंचायतीपासून पंचायत समितीच्या अधिका-यांकडून आर्थिक लूट होत असल्याचा थेट आरोप आढळगाव गटाच्या जिल्हा परिषद सदस्या पंचशिला गिरमकर यांनी केल्यानंतर चर्चेचा सूर बदलला. आमदार बबनराव पाचपुते यांनीही या आरोपला पुष्टी देत असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत असा इशारा दिला. ऑनलाईन कार्यशाळेला उपस्थित असलेल्या सरपंच आणि अन्य पदाधिका-यांनीही आरोप केले. या आरोपांवर काही ठोस विधान करण्याऐवजी ऑनलाईन कार्यशाळाच गुंडाळण्याची वेळ गटविकास अधिकारी गोरख शेलार यांच्यावर आली. चौकट: जिल्हा परिषद सीईओंच्या दालनात बैठक घेण्याचे आव्हान.... घरकुलांसाठी आर्थिक लूट झालेल्या लाभार्थ्यांना जिल्हा परिषद सीईओंच्या दालनात हजर करणार असून त्यासाठी सीईओंच्या दालनात बैठक घेण्याचे आव्हान जिल्हा परिषद सदस्या पंचशिला गिरमकर यांनी ऑनलाईन कार्यशाळेतच गटविकास अधिकारी गोरख शेलार यांना दिले.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

यवत येथील मतदान केंद्रावर दिवसभर मतदारांच्या रांगा. ईव्हीएम मशिन मात्र संत गतीने. उशीरा पर्यंत नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क.

शरद पवारांच्या सभेला आणलेल्या खुर्च्या. देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत वापरल्या. तालुक्यात होतेय चर्चा

श्रीगोंदयाच्या आमदारकीवर नागवडेंचाच सर्वाधिक नैतिक अधिकार.

श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव सोहळा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात सुरू. यवत नगरीत भक्तीमय वातावरण.

श्रीगोंद्यात वंचित च्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी, 3 साखर सम्राट विरोधात सामान्य शेतकऱ्यांचे मोठे आवाहन, सभेचा विरोधकांनी घेतला धसका

श्रीगोंद्यात धनगर समाज नागवडे सोबत- कोल्हटकर

वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आण्णासाहेब शेलार यांच्या प्रचारार्थ आज 1वा.ॲड प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा.गर्दीचा नवीन विक्रम होणार

विक्रम पाचपुते यांनी लोकांची फसवणूक करत गुन्हेगारीत विक्रम करत विकास कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी प्रमाणात वसुली केली तर नागवडे यांच्या 15 खोक्यांनी माझ्या तिकीटाचा सौदा केला - राहुल जगताप

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. अनुराधा नागवडे यांना बहुमताने विजय करा निधी कमी पडून देणार नाही उद्धव ठाकरे

सौ अनुराधाताईंना नागवडेंना प्रचंड मताने निवडून द्या विकासाची हमी आम्ही घेतो- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

मतदान जनजागृती कार्यक्रम २०२४ अंतर्गत दौंड नगर परिषदेतर्फे सायकल रॅलीचे यशस्वी आयोजन: मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय कावळे.

महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ अनुराधाताई नागवडे यांच्या उद्याच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता

श्रीगोंद्यात मतदान अधिकारी मतदान कर्मचाऱ्यांचे द्वितीय प्रशिक्षण संपन्न

अनुराधाताई नागवडे यांच्या प्रचारार्थ 14 नोव्हेंबर रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात श्रीगोंद्यात

दौंड - पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची आमदार राहुल कुल यांनी घेतली भेट, कुल यांना दौंडकर प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

गौरी शुगर ऊसाला देणार जिल्ह्यात एक नंबरचा बाजार भाव चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील

महायुतीने केलेल्या कामाचे श्रेय थोरात यांनी घेऊ नये- वैशाली नागवडे.

दौंड तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राहुल कुल यांच्या बरोबर राहणार- आनंद थोरात.

सैनिक समाज पार्टीचे उमेदवार मा.विनोद साहेबराव साळवे यांनी घेतले शेख मोहम्मद महाराज यांचें दर्शन

अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांच्या गावभेट दौऱ्याला मिळतोय चांगला प्रतिसाद