लेखक दिग्दर्शक किरण विमल पोटे प्रस्तुत चिल्लर पार्टी तर्फे रविवारी शाहू स्मारकामध्ये कल्टी मराठी सिनेमा प्रदर्शन

By : Polticalface Team ,Thu Jan 20 2022 15:31:52 GMT+0530 (India Standard Time)

लेखक दिग्दर्शक किरण विमल पोटे प्रस्तुत चिल्लर पार्टी तर्फे रविवारी शाहू स्मारकामध्ये कल्टी मराठी सिनेमा प्रदर्शन कोल्हापूर: चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळीमार्फत कल्टी हा आपल्या कोल्हापूरच्या दिग्दर्शकाने बनवलेला चित्रपट दाखवण्यात येत आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचे वर्ल्डकप जिंकण्याचे स्वप्न २०११ मध्ये पूर्ण झाले. याच सामन्यातील महेंद्रसिंग धोनीनं मारलेला विजयी षटकार आणि तो चेंडू या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित कल्टी हा चित्रपट आपल्या कोल्हापूरच्या मातीतील दिग्दर्शकांने बनवलेला आहे. या चित्रपटात ग्लॅमरपेक्षा गुणवत्तेला महत्व असते, असा संदेश देण्यात आला आहे. या चित्रपटात शशांक शेंडे, योगेश सोमण, सागर कारंडे, साईनाथ मुदणकर यांच्या भूमिका आहेत. नाशिक येथील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांतर्गत प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके राष्ट्रीय गोल्डन कॅमेरा ऍवॉर्ड कोल्हापूर जिल्हयातील लेखक, दिग्दर्शक किरण पोटे यांच्या कल्टी या सिनेमाला मिळाला आहे. कलापूरच्या शिरपेचात यानिमित्ताने आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून, या सिनेमाने सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, बालकलाकार, कला दिग्दर्शन, कॅमेरामन, गीतकार, सहायक अभिनेता यासह एकूण सात पुरस्कारांवर नाव कोरले आहे. --------------- या सिनेमाचा दिग्दर्शक किरण पोटे हा कोल्हापूर जिल्हयातील सरूड (ता. शाहूवाडी) गावचा. कोल्हापुरात शालिनी सिनेटोनमध्ये ज्युनिअर आर्टिस्ट म्हणून काम सुरू केले आणि पुढे अभिरुची नाट्य संस्थेच्या माध्यमातून संजय हळदीकर यांच्या मार्गदर्शनाखाली रंगभूमीवर त्याने अनेक प्रयोग केले. त्यानंतर पंधरा वर्षांपूर्वी फिल्म इंडस्ट्रीतच करिअर करण्यासाठी त्याने थेट मुंबई गाठली.पंधरा ते सोळा सिनेमांत छोट्या-मोठ्या भूमिका केल्यानंतर दिग्दर्शक जयसिंग ठाकूर यांनी त्याला दिग्दर्शनात संधी दिली आणि नऊ महिने नऊ दिवस या सिनेमासाठी पहिल्यांदा क्रिएटिव्ह दिग्दर्शक म्हणून काम केले. त्यानंतर होणार सून मी ह्या घरची, माझे पती सौभाग्यवती आदी विविध मालिकांसाठीही क्रिएटिव्ह दिग्दर्शक म्हणून काम केले. याच काळात त्याने चिंध्या ही पहिली शॉर्टफिल्म लिहिली. शिवाजी उद्यमनगरातील चिंध्या विकणाऱ्या महिला आणि राजर्षी शाहू वसाहतीतील महिला व त्यांच्या संसाराच्या गाड्यावर बेतलेल्या या शॉर्टफिल्मलाही विविध पुरस्कार मिळाले. त्यानंतर त्याने कल्टी हा लेखक व दिग्दर्शक म्हणून पूर्ण लांबीचा पहिला सिनेमा केला आणि त्याला पुरस्कार मिळाला. ----------------- चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळ-मराठी चित्रपट - कल्टी दिनांक -२३ जानेवारी २०२२,स्थळ -राजर्षी छत्रपती शाहू स्मारक भवन,वेळ -१०. ३०
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.