पंढरीची वारी हे जीवन शुद्धीचे मोठे साधन ------------- ह.भ. प. दंडवते महाराज
By : Polticalface Team ,23-06-2025
लिंपणगाव ( प्रतिनिधी) पंढरीची वारी ही मानवी जीवन शुद्धीचे मोठे साधन असून जो वारीमध्ये रंगतो त्याच्या जीवनाचा रंग बदलतो. असे प्रतिपादन ह.भ.प. परमेश्वर महाराज दंडवते यांनी व्यक्त केले.
ह. भ. प. चंद्रकांत महाराज दंडवते यांच्या मार्गदर्शनाखाली देवदैठण ता. श्रीगोंदा येथील श्री.संत निंबराज महाराज पायी दिंडी सोहळ्याचे आगमन रविवारी सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना साइटवर झाले. सदर प्रसंगी उपस्थित वारकरी व ग्रामस्थ यांना मार्गदर्शन करताना दंडवते महाराज बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, मानवी जीवनातील षडरिपुंचे निर्दालन करून जीवन शुद्ध व स्वच्छ करण्याकरिता संतांनी वारीची परंपरा घालून दिली . वारीमध्ये शारीरिक, मानसिक, बौद्धिक व वाचिक तप घडते व त्यामुळे जीवन पवित्र होण्यास मदत होते.
यावेळी दिंडी सोहळ्याचे स्वागत करताना भाऊसाहेब बांदल म्हणाले की, वैज्ञानिक युगामध्ये माणसाने मोठी प्रगती केली परंतु अंतर्मन अशांत, अस्थिर व भयभीत झालेले आहे. अनेक समस्यांनी त्रस्त झालेल्या माणसाला फक्त संतांच्या चरणी शांती व समाधान प्राप्त होते. त्यामुळे वारीमध्ये घडणारी संत संगती माणसाचे जीवन बदलवणारी आहे. अज्ञान, अविचार , कुसंगती व द्वेष बुद्धीवर वार करून जीवन मंगलमय करण्याची संधी वारीच्या रूपाने मिळत असते. त्यामुळे स्वर्गीय बापूंनी घालून दिलेल्या परंपरेनुसार राजेंद्र दादा नागवडे यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडी सोहळ्याचे स्वागत करताना सांस्कृतिक मंडळास आनंद होत आहे.
यावेळी कारखान्याचे संचालक विठ्ठल बापू जंगले व कार्यकारी संचालक प्रवीण शिंदे यांनी दिंडी सोहळ्यास शुभेच्छा दिल्या. यावेळी तालुका दूध संघाचे संचालक गौतमराव मुळे, मढेवडगाव सोसायटीचे चेअरमन प्रकाश उंडे , कारखान्याचा अधिकारी वर्ग भरत नलगे, कानिफनाथ गव्हाणे ,बाळासाहेब लगड चंद्रशेखर मगर, भास्कर जंगले, चंद्रकांत कुरुमकर, ज्ञानेश्वर थोरात, राजेंद्र लगड तेजस नागवडे, किसन कोल्हटकर, विश्वनाथ बोरुडे, केशव पवार , हौसराव भुजबळ, राजेंद्र भुजबळ, एम. डी. खांडेकर, शहाजी चौधरी व कामगार उपस्थित होते.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.