श्रीगोंदा तालुक्यातील औटी वाडी येथील समाजकारणातील कोहिनूर हिरा हरपला

By : Polticalface Team ,Sat Jan 22 2022 09:42:50 GMT+0530 (India Standard Time)

श्रीगोंदा तालुक्यातील औटी वाडी येथील समाजकारणातील कोहिनूर हिरा हरपला श्रीगोंदा प्रतिनिधी :- श्रीगोंदा तालुक्यातील राजकीय,सामाजिक,शैक्षणिकरित्या महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या औटी वाडी येथील सामाजिक बांधिलकी जपणारे वसंत सकाहारी औटी यांचे नुकतेच १७ जानेवारी २०२२ वयाच्या ७० व्या वर्षी निधन झाले,काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती परंतु त्यांनी कोरोनावरती यशस्वीरीत्या मात केली होती.परंतु १७ जानेवारी रोजी सकाळी ११वा त्यांची प्राणज्योत मावळली. खरं पाहता वयाच्या ७० व्या वर्षी त्यांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली होती परंतु अशक्तपणामुळे तसेच शारीरिक अनेक व्याधिनंमुळे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वसंत औटी यांचा जन्म १९५२ ते १९५३ च्या दरम्यान चा होता, त्यांचा जन्म श्रीगोंदा तालुक्यातील हाकेच्या अंतरावर असणाऱ्या औटी वाडी येथील शेतकरी कुटुंबामध्ये झाला होता. लहानपणापासूनच समाजसेवेची नाळ वसंत औटी यांच्याशी जुळलेली होती, वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी त्यांनी लिंबाच्या व्यापारा मधून त्यांनी व्यवसायाची सुरुवात केली, व्यवसाय करता करताच समाजसेवेची जाण असलेल्या वसंत औटी यांनी तेव्हांपासून समाजसेवा करण्यास सुरुवात केली,१९७२ च्या भयानक पडलेल्या दुष्काळामध्ये त्यांनी त्यांची स्वतःची विहीर सर्व जाती-धर्मांच्या जनतेसाठी खुली करून दिली होती.गावातील कोणत्याही समाजाच्या अडीअडचणी मग त्या आर्थिक असू किंवा कोणतीही असो त्या सोडविण्यास ते नेहमी अग्रेसर असत हळूहळू संपूर्ण औटी वाडी मध्ये तसेच पंचक्रोशी मध्ये सर्व सामाजिक कार्यांमध्ये त्यांचा सहभाग वाढत गेला, अनेक महिलांचा हुंडा,सासरचा छळ, इत्यादी अनेक कारणांवरून त्यांनी मध्यस्थी करत महिलांचे प्रपंचा वाचविण्याचे काम केले,व हरेक समाजाचे लग्न त्यांनी जुळवून दिले तरुणांपासून वयोवृद्ध माणसांपर्यंत ते परिचित होत गेले, त्यानंतर वयाच्या ३४ व्या वर्षी समाजकारणातून त्यांनी राजकारणात सक्रिय झाले, तसेच त्यांचे बंधू मारुती औटी यांना नगरसेवक करण्यास त्यांचा मोठा वाटा होता,औटी वाडी प्रभागातुन प्रत्येक वेळेसचे नगरसेवक जयराम शेळके ते विद्यमान नगरसेवीका दिपाली अंबादास औटी, जे नगरसेवक होईल त्यांच्या निवडीचे श्रेय वसंत औटी यांनाच जाते,ऐवढेच नाही तर ते औटी वाडी प्रभागातुनच नगरसेवक निवडून आणन्यासाठी किंगमेकर समजले जायचेे, औटीवाडी व परिसरातील कोणत्याही समाजातील वाद-विवाद ते स्वतः मिटवत शक्यतो ते वाद पोलीस स्टेशन पर्यंत त्यांनी कधी जाऊ दिले नाही. अनेकांचे मोडलेली संसार उद्ध्वस्त होण्यापासून त्यांनी वाचवले,स्वर्गीय वसंत औटी हे मा.मंत्री विद्यमान आमदार मा.श्री.बबनदादा पाचपुते यांचे शेवटपर्यंत कट्टर समर्थक राहिले. तसेच त्यांचे जेष्ठ चिरंजीव अनिल औटी हे त्यांचा सामाजिक वसा चालवताना दिसत आहे, स्वर्गीय वसंत औटी यांच्या पश्चात दोन मुले,एक मुलगी,पत्नी,सुना, नातवंडे आहेत. त्यांच्या अंत्यविधी वेळेस कृषी आयुक्त दादासाहेब सप्रे सुभाष काळाणे कृषी बाजार समिती संचालक , माजी नगरसेवक दादा औटी सर भाऊ औटी प्राचार्य शहाजी हिरडे प्रदीप औटी रिटायर मुख्या धापक दशरथ तुपे सतिश बाजीराव तुपे शंकर हिरडे सर्व क्षेत्रातून,त्यांना मानणारा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.