श्रीगोंदा अहमदनगर विधानसभा मतदार संघासाठी मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेअंतर्गत 28 जलसाठ्यांसाठी 8 कोटी 40 लक्ष रुपये निधी मंजूर. पाठपुराव्याला यश - आमदार बबनराव पाचपुते.
By : Polticalface Team ,Sat Jan 22 2022 18:49:25 GMT+0530 (India Standard Time)
श्रीगोंदा प्रतिनिधी/
महाराष्ट्र राज्यातील पूर्ण झालेला जलसंधारण योजनांपैकी देखभाल व दुरुस्ती आवश्यक असलेल्या योजनांचे परीक्षण व दुरुस्ती करून सिंचन क्षमता पुनर्स्थापित करण्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री जल संवर्धन योजना राबविण्यात येत आहे या अंतर्गत श्रीगोंदा अहमदनगर विधानसभा मतदार संघासाठी जल संवर्धन योजना अंतर्गत श्रीगोंदा तालुक्यासाठी 6 कोटी 67 कोटी लक्ष रुपये निधी मंजूर झाला असून यातून मतदारसंघातील 25 ठिकाणच्या जलसाठ्यांची दुरुस्ती करण्यात येणार आहे. तसेच नगर मतदार संघातील 3 जलसाठ्यांसाठी 71.48 लक्ष रुपये असे एकूण 8 कोटी 40 लक्ष रुपये मंजूर झाले असल्याचे आमदार बबनराव पाचपुते यांनी सांगितले. श्रीगोंदा नगर विधानसभा मतदारसंघातील मतदार संघातील अनेक जलसाठे मधून पाण्याची गळती होऊन मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत असल्याने हा अपव्यय थांबविण्यासाठी जलसाठा पुनर्स्थापित करण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री जलसंवर्धन योजना मध्ये श्रीगोंदा तालुका साठी जलसंधारण मंत्री नामदार शंकरराव गडाख यांच्या सहकार्याने राबविण्यात येत आहे जलसाठे यांच्या संवर्धनामुळे पाण्याचा अपव्यय टाळता येईलच, शिवाय पाणीसाठ्यात वाढ होऊन साठणाऱ्या या पाण्याचा शेतीसाठी व पिण्यासाठी उपयोग होणार आहे. अशी माहिती आमदार पाचपुते यांनी दिली.
वाचक क्रमांक :