बीड येथे होणाऱ्या काँग्रेस पक्षाचे डिजिटल सदस्य नौदणी अभियान राबविण्यासंदर्भात ; बैठकीस पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे- काँग्रेस नेते अँड. प्रकाश मुंडे

By : Polticalface Team ,Mon Jan 24 2022 08:44:34 GMT+0530 (India Standard Time)

बीड येथे होणाऱ्या काँग्रेस पक्षाचे डिजिटल सदस्य नौदणी अभियान राबविण्यासंदर्भात ; बैठकीस पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे- काँग्रेस नेते अँड. प्रकाश मुंडे परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- बीड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने महिला महाविद्यालय,बीड येथे मंगळवार,दि.२५ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. बैठकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या डिजिटल सदस्य नोंदणी अभियान प्रभावीपणे कसे राबवायचे याबाबत मान्यवर नेते हे काँग्रेस पक्ष पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांशी चर्चा करून संवाद साधणार आहेत.आणि मार्गदर्शन ही करणार आहे.तरी या बैठकीस परळी तालुक्यातील काँग्रेस कमेटीच्या सर्व पदाधिकारी यांनी उपस्थित रहावे असे आवाहन काँग्रेसचे नेते अँड. प्रकाश मुंडे यांनी केले आहे. बीड जिल्ह्यातील काँग्रेस कमिटीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत जिल्हा कमेटीच्या पदाधिकाऱ्यांसह विविध सेलचे अध्यक्ष यांच्याशी चर्चा करून थेट संवाद साधण्यात येणार आहे.तसेच काँग्रेस पक्ष संघटना मजबूत करण्यावर भर देण्यात येणार आहे.महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आमदार नानाभाऊ पटोले,खासदार सौ.रजनीताई पाटील,माजी मंञी अशोकराव पाटील, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबुराव मुंडे, जिल्हाध्यक्ष राजसाहेब देशमुख, यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्ह्यात काँग्रेस पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी प्रभावीपणे कार्य करण्यात येत आहे. काँग्रेस पक्ष डिजीटल सदस्य नोंदणी अभियान ग्रामीण आणि शहरी भागात कसे राबवायचे,याचे नियोजन आणि पूर्वतयारी संदर्भात चर्चा करण्यात येणार आहे.जिल्ह्यात काँग्रेस पक्षातील सर्वांना सोबत घेऊन जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करून काँग्रेस पक्ष संघटना अधिक मजबूत करणार आहोत.अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून नुकतेच डिजीटल सदस्यता नोंदणी अभियान सुरू करण्यात आले आहे.केवळ "मिस कॉल" देऊन सदस्य नोंदणी करण्यासारखे हे अभियान नसून काँग्रेस पक्षाचे डिजीटल सदस्य नोंदणी अभियान हे अत्यंत पारदर्शक व विश्वासार्ह सदस्यता नोंदणी अभियान आहे.आपण सर्वजण एकत्रितपणे हे अभियान यशस्वी करण्याकरीता बीड जिल्ह्यातून मोठे योगदान देऊयात.दिवंगत पंतप्रधान राजीवजी गांधी यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा पाया देशात घातला.त्याचे पुढचे पाऊल म्हणजे हे डिजीटल सदस्य नोंदणी अभियान आहे.ऍप आणि मोबाईलच्या माध्यमातून ही सदस्य नोंदणी करता येणार असून,अत्यंत जलदगतीने होणारी ही प्रक्रीया विश्वासार्ह आहे.डिजीटल सदस्यता नोंदणी अभियान अत्यंत महत्वाचे असून यातून बीड जिल्ह्यात काँग्रेस पक्ष संघटन मजबूत होण्यास मदत होणार आहे.प्रत्येक बुथवर दोन स्वयंसेवक,एक महिला व एक पुरूष यांच्या माध्यमातून घराघरात जाऊन ऍपच्या माध्यमातून ही सदस्यता नोंदणी केली जाणार आहे.सदस्य नोंदणी होताच त्या सदस्याला एसएमएस येईल आणि या सदस्यांना ओळखपत्र (आयडी कार्ड) ही देण्यात येणार आहे.डिजीटल सदस्यता अभियान कसे चालवले जाईल या बाबतची सविस्तर माहिती बैठकीतून देण्यात येईल.एक सदस्य नोंदणी करण्यास एक मिनीटापेक्षा जास्त वेळ लागणार नाही.१०० टक्के विश्वासार्ह सदस्य नोंदणी असून निवडणूक आयोगाच्या डेटासोबत ही माहिती पडताळून पाहिली जाईल.मोबाईच्या माध्यमातून ही सदस्य नोंदणी अत्यंत जलदगतीने होणार आहे. तरी परळी तालुक्यातील सर्व काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी बैठकीस मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन काँग्रेस नेते अँड प्रकाश मुंडे यांनी केले आहे.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.